Karnataka Assembly Elections Result 2023 :  Congress : Muslim Reservation
Karnataka Assembly Elections Result 2023 : Congress : Muslim Reservation Sarkarnama
देश

Karnataka Election : कर्नाटकात जिंकणारे सर्व मुस्लिम आमदार काँग्रेसचे; आरक्षणाचा मुद्दा ठरलं कारण ?

Chetan Zadpe

Karnataka Assembly Elections Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ मुस्लिम उमेदवार विजयी झाले असून ते सर्वच्या सर्व काँग्रेस पक्षाचे आहेत. कर्नाटकातील विधानसभेच्या 224 पैकी 135 जागा जिंकून काँग्रेसने दमदार कामगिरी केली होती. तर भाजपला 66 जागांवर समाधान मानावे लागले. (Muslim Reservation News)

इतर समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजाची मते काँग्रेसच्या बाजूने एकवटल्याचे निवडणूक निकालावरून दिसते. कर्नाटकातील एकूण मतदारांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सुमारे १३ टक्के आहे. काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचे आश्वासन दिले होते, जे या आधीच्या भाजप सरकारकडून रद्द करण्यात आले होते.

जेडीएसचे 23 मुस्लिम उमेदवार :

हिजाब पेहरावाबद्दल वादघडून आल्यानंतर आणि केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर राज्यातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. काँग्रेसने 15 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आणि त्यापैकी नऊ विजयी झाले. जेडीएसने 23 मुस्लिम उमेदवार उभे केले होते, पण यापैकी एकही मुस्लिम उमेदवार विजयी झाला नाही.

कर्नाटकातील गुलबर्गा उत्तर मतदारसंघातील आमदार फातिमा या एकमेव मुस्लिम महिलेला काँग्रेसने उमेदवारी दिली होती. या नऊ मुस्लिम उमेदवारांपैकी फक्त दोघेच आसिफ (राजू) सैत आणि इक्बाल हुसेन पुन्हा एकदा निवडून आले आहेत. उर्वरित सात आमदार प्रथमच विधानसभेत पोहोचणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT