Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :Sarkarnama

Thackeray Vs Shinde : ठाकरेंच्या ड्रिम प्रोजक्टला संभाजी महाराजाचं नाव; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेची ठाकरेंवर राजकीय कुरघोडी..
Published on

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं निमित्त साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार असल्याचे जाहीर केलं. ही घोषणा केल्यानंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जोरदार जयजयकार केला.

दरम्यान, या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांचे या निर्णयाबाबत कौतुक होत आहे. मात्र महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच कोस्टल रोड हे ड्रिम प्रोजेक्ट मानलं जातं. आपल्या कार्यकाळात ठाकरे कोस्टल रोडसाठी फार आग्रही होते. सरकार बदल्यानंतर कोस्टल रोडचं नामकरण मुख्यमंत्री शिंदेंनी केल्याने, याकडे आता शिंदेंची ठाकरेंवर राजकीय कुरघोडी म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले, "मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Maharashtra Politics : कर्नाटकच्या विजयाने आघाडीला बळ; पवार, ठाकरे अॅक्शन मोडवर : बैठकीत ठरला 'हा' प्लॅन

फडणवीस पुढे म्हणाले, 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे."

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :
Cm Eknath Shinde News : भामटा शब्द काढणार, महाराणा प्रतापांच्या नावे आर्थिक विकास महामंडळही सुरू करणार..

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोड लवकरच पूर्ण होणार असे बोलले जात आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या कामाचा महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासोबत आढावा घेतला होता, याबाबत माहिती ही दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com