Cash Burning Inquiry : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानातील एका खोलीत अर्धवट जळालेल्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या. संबंधित खोलीचा कुटुंबियांकडून नियमितपणे वापर व्हायचा.
हे पाहता वर्मा यांच गैरवर्तन सिद्ध होते. हा प्रकार गंभीर असून त्यांना हटविण्यासाठी ठोस कारण पुरेसे असल्याचे चौकशी समितीने अहवाल नमूद केले आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे (Court) मुख्य न्यायमूर्ती शील नागू यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समितीने या नोटा प्रकरणाची 10 दिवस चौकशी केली. या समितीने 55 साक्षीदार तपासले. घटनास्थळी चौकशी समितीने 14 मार्चला रात्री 11.35 वाजता भेटही दिली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा सध्या अलाहबाद उच्च न्यायालयात आहेत.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात महाभियोगाची शिफारस करण्याची मागणी माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केले आहे. समितीत न्यायमूर्ती शील नागू यांच्याशिवाय हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी. एस. संधावालिया व कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनु शिवरामन यांचा देखील समावेश होता.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानातील खोलीत जी रक्कम सापडली ती खोली कुटुंबीय वापरत होते. आगीनंतर 15 मार्च 2025 रोजी पहाटेच्या सुमारास या खोलीतून जळालेल्या नोटा पहाटेच्या वेळी हटविण्यात आल्या. हे पाहता भक्कम पुरावा असल्याचे 64 पानी अहवालात नमूद करण्यात आले.
सरन्यायाधीशांनी 22 मार्च रोजी पत्र पाठवून जे आरोप केले होते, त्याच्याशी समिती सहमत आहे. हे आरोप गंभीर असल्याने यशवंत वर्मा यांना हटविण्याची कार्यवाही सुरू करण्याची आवश्यकता समितीने व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.