
Mumbai News : रायगडचे पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच नवा कलगितूरा रंगला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावरून पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी दावा केला होता. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा भरत गोगावलेंवर अघोरी पूजा केल्याचा आरोप केलाय. त्या दाव्यावर आणि त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी सूरज चव्हाण यांना इशारा देखील दिला आहे. ते मुंबईत बोलत होते.
गोगावले यांनी, "त्या व्हिडीओत मी घरी बसलो असून अंघोळ करायच्या आधी टॉवेलवर बसलो आहे. तेथे कधीकधी फिरणारे महाराज, संत मंडळी येत असतात, त्यांना भेटी देऊन आमचं मार्गक्रमण सुरु असतो. पण आता असा व्हिडीओ काढून अघोरी पूजा केली असे म्हटलं जातयं. मात्र ज्याला कुणाला अघोरी विद्या करायचीय तो असा व्हिडीओ काढतो का? आम्ही ग्रामीण भागातील आमदार असल्यामुळे आमच्याकडे सकाळपासून लोकं येत असतात. त्यांना भेटावं लागतं.
पण ठिक आहे. ज्याला कर नाही त्याला डर नाही. त्यामुळे आम्ही फ्री वातावरणात फिरणारी लोकं आहोत. त्यामुळे त्यांनी काय व्हायरल केलं याची आम्हाला काही अडचण नाहीच. आता सूरज चव्हाण यांनी असे अजून काही व्हिडीओ असतील तीही शोधावीत, असेही आव्हान गोगावले यांनी दिले आहे. तसेच गोगावले यांनी चव्हाण यांना इशारा ही दिला आहे. ते जे करत आहेत ते चुकीचं असून जी कारवाई होईल त्याना आपण सामोरं जायला तयार आहोत. पण सध्या जे सुरू आहे ते चुकीचं असून आता आम्हाला देखील व्हिडीओ भेटले आहेत. तेही आता सुरू होतील.
यावेळी गोगावले यांनी शिवसेनेचा 59 वा वर्धापन असून तो संपन्न होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे मार्गदर्शनही करतील. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत मार्गदर्शन होणार असून संघटनेबाबतही महत्वाच्या सूचना दिल्या जाणार असल्याचेही भरत गोगावले म्हणाले.
सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच ते म्हणाले होते की, काल एक व्हिडिओ मिळाला. संविधानिक पदावर बसलेल्या एक व्यक्तीकडून बाबा बुवा यांच्याकडून पुजा करून घेत आहे. वसंत मोरे यांनीही एक व्हिडिओ दाखवला होता. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं. पालकमंत्रीपदासाठी अशा प्रकारच्या पुजेचा घाट घालणं चुकीचा आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याची दखल घ्यायला हवी अशीही मागणी सूरज चव्हाण यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.