Allahabad High Court affirms that freedom of speech does not justify defamatory remarks against the Indian Army, rejecting Rahul Gandhi’s plea.  Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधींना कोर्टाने धरले धारेवर; भारतीय सैन्याविषयी बोलणे भोवणार?

Allahabad High Court Defines Limits of Free Speech : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी 2022 मध्ये वादग्रस्त विधान केले होते. चिनी सैनिक अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैनिकांना मारत असल्याचे ते म्हणाले होते.

Rajanand More

Freedom of Expression : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बुधवारी कोर्टाने चांगलेच फटकारले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैनिकांविषयी केलेल्या विधानावरून त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी अलाहाबाद हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने राहुल गांधी यांना धारेवर धरले.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी 2022 मध्ये वादग्रस्त विधान केले होते. चिनी सैनिक अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैनिकांना मारत असल्याचे ते म्हणाले होते. राजस्थान येथील एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले होते. त्याविरोधात लखनऊ येथील एका न्यायालयात मानहानीच्या याचिका दाखल करण्यात आली आहे.

लखनऊ येथील कोर्टाने राहुल यांच्याविरोधात समन्स जारी केले होते. त्याविरोधात राहुल यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. उलट राहुल यांनाच खडेबोल सुनावले आहेत. कोर्टाने म्हटले की, संविधान भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते. पण हे स्वातंत्र्याला काही निर्बंधही आहे. भारतीय सैन्यविषयी अपमानजनक भाष्य करण्याचे स्वातंत्र्याचा समावेश त्यात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ सैन्याला बदनाम करणे नव्हे, असे शब्दांत कोर्टाने राहुल यांना फटकारले आहे.

काय म्हणाले होते राहुल?

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, भारत जोडो यात्रा, अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि वेगवेगळ्या गोष्टींबाबत लोक विचारतील. पण चीनद्वारे 2000 चौरस किलोमीटर भारतीय जमीन बळकावणे, 20 भारतीय सैनिकांना मारणे आणि अरूणाचल प्रदेशात आपल्या सैनिकांना मारहाण करण्याविषयी एकही प्रश्न विचारणार नाहीत. भारतीय मीडियावर बोलणार नाही.

राहुल यांच्या या विधानानंतर सीमा रस्ता संघटनेचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी मानहानीची याचिका दाखल केली आहे. अरूणाचल प्रदेशात आपल्या सैनिकांना चीनी सैन्य मारहाण करत असल्याचे राहुल अपमानजनक पध्दतीने बोलत होते, असा आरोप श्रीवास्तव यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेला विरोध करताना राहुल यांनी म्हटले होते की, ‘याचिकाकर्ता भारतीय सैन्याचे अधिकारी नाहीत. ते पीडित व्यक्ती नाहीत.’ मात्र, कोर्टाने त्यांचा हा दावा खोडून काढत याचिकाही फेटाळली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT