Caste-Based Census : जनगणनेबाबत मोठी बातमी; तारखा आल्या समोर, दोन टप्पे झाले निश्चित

Indian census updates : जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातनिहाय नोंद होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला हिरवा कंदील दाखवला होता.
Caste Census
Caste CensusSarkarnama
Published on
Updated on

India Census latest News : मागील चार वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जनगणनेच्या तारखा समोर आल्या आहेत. देशभरात दोन टप्प्यांत ही जनगणना होणार असून त्याची सुरूवात 1 मार्च 2027 पासून होणार आहे. तर लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ प्रदेशांत ऑक्टोबर 2026 पासूनच जनगणना सुरू केली जाणार आहे.

जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातनिहाय नोंद होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर आता जनगणनेच्या तारखाही समोर आल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, सरकारमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2027 पासून देशभरात प्रत्यक्ष जनगणना सुरू होईल.

जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घेतील. त्यामध्ये प्रत्येकाची जातही विचारली जाणार आहे. जातनिहाय आकडेवारी एकत्रित करण्यासाठी पहिल्यांदाच जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख केला जाणार आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती.

Caste Census
Raj Thackeray News : घुमजाव करण्याचा डाव तर नाही ना? राज ठाकरेंचे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना खरमरीत पत्र...

जनगणना झाल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व इतर प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानुसार संबंधित घटकांना सरकारी योजनांचे लाभ, आरक्षण आदी बाबतीत अनेक बदल होऊ शकतात. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटविण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे. प्रत्यक्ष जनगणनेमधील आकडेवारीनंतर याबाबतही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Caste Census
India Vs Pakistan : या 'ऑपरेशन'मध्ये पाकिस्तानची सरशी; भारताचे डावपेच अपयशी?

दरम्यान, भारतात यापूर्वी 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यावेळी भारतात 121 कोटी 8 लाख 54 हजार 977 लोकसंख्या होती. त्यामध्ये 62 कोटी 32 लाख पुरूष तर 58 कोटी 75 लाख महिला होत्या. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये जनगणना व्हायला हवी होती. मात्र, कोरोना आणि इतर कारणांमुळे जनगणना होऊ शकली नाही. त्याला तब्बल चार वर्षे विलंब झाला आहे. आता अखेर ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com