India-Canada Controversy : sarkarnama
देश

India-Canada Controversy : भारतावर आरोप करून स्वत:च फसले जस्टिन ट्रुडो; मित्रराष्ट्रांनीही सोडली साथ

International Politics : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे गेल्या आठवडाभरापासून भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढला आहे.

अनुराधा धावडे

New Delhi : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे गेल्या आठवडाभरापासून भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूमागे भारताच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले. या घटनांच्या सुरुवातीला ट्रुडो यांना इतर मित्रराष्ट्रांचाही पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्यांना कुणाचाही पाठिंबा मिळत नसल्याचे आढळून आले आहे.

कॅनडाच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे ट्रुडो अनुत्तरित झाल्याची माहिती समोर आलीआहे. कॅनडाच्या पत्रकारांनी ट्रुडो यांना निज्जरची हत्या आणि त्यासंबंधित भारताच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले; पण ट्रुडो यांना उत्तरे देता आली नाहीत. इतकेच नव्हे तर इतर मित्र राष्ट्रांनीही त्यांना कोणताही पाठिंबा न दिल्यामुळे ते एकटे पडल्याचे दिसत आहे.

ट्रुडो यांनी आपणास आरोपांना उघड समर्थन अपेक्षित आहे. परंतु फाइव्ह आयज इंटेलिजन्स युतीमधील त्यांच्या सहयोगींनी त्यांना समर्थन देणे पूर्णपणे टाळले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली म्हणाले की, कॅनडा काय म्हणत आहे, त्याबद्दल आपला देश गंभीर आहे. तर ट्रूडोच्या आरोपांमुळे आम्ही चिंतेत असल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाने दिली. कॅनडाच्या शेजारी देश अमेरिकेनेही यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन पाळले. ट्रुडो यांना अपेक्षा होती की, त्यांच्या आरोपानंतर मित्र राष्ट्र भारतावर नाराज होतील, परंतु अमेरिकेनेही नाराजी व्यक्त न केल्याने आता ट्रुडो हेदेखील एकटे पडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT