Eknath Khadse v/s Mangesh Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांना भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील सडेतोड उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी आपल्यावरील आरोप खडसेंवरच उलटवले आहेत. (Jalgaon BJP & NCP politics on Milk fedration)
जळगाव (Jalgeon) जिल्हा दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दूध संघाच्या कारभारावर टीका केली होती. त्याला भाजपचे (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात सहा कोटी रुपयांचा तोटा असल्याचा आरोप केला होता. त्यात भाजपच्या मंडळींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
याबाबत जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळत, त्या स्थितीला खडसे यांनाच जबाबदार धरले आहे. आमदार चव्हाण म्हणाले, जिल्हा दूध संघाला सहा कोटींचा तोटा मंदाकिनी खडसे अध्यक्ष असतानाच्या काळातीलच आहे. आम्हाला केवळ तीन महिने कालावधी मिळाला असून, त्या काळात नफा झाला आहे, असे सांगितले.
आमदार चव्हाण म्हणाले, की आम्ही डिसेंबर २०२२ मध्ये सत्तेवर आलो. आम्हाला जानेवारी, फेब्रुवारी व मार्च असा केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. या तीन महिन्यांत आम्ही दूध संघ नफ्यात आणला. अगोदरचा आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी जुन्या संचालक मंडळाचा आहे. त्यांच्या काळात संघ एकही दिवस नफ्यात नव्हता. त्याच काळात तब्बल सहा कोटी रुपयांचा तोटा झाला.
जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी थेट खडसे यांनाच डिवचले आहे. खडसे यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ असे ते नेहमी करतात. त्याचप्रमाणे त्यांनी विधान केल्याचा आरोप त्यांनी केल्याने त्याचे पडसाद दूध संघाच्या बैठकीत उमटण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.