Elon Musk Makes Big Announcement: Withdraws Support for Donald Trump Sarkarnama
देश

Elon Musk Donald Trump: इलॉन मस्क यांची मोठी घोषणा; डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली

Elon Musk Announces Departure from US President Donald Trump Administration: ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी दिली होती. ट्रम्प यांचे सल्लागार पद सोडण्याची घोषणा एलन मस्क यांनी केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सांयकाळी त्यांनी ही घोषणा केली.

Mangesh Mahale

Elon Musk Withdraws Support for Donald Trump: अमेरिकी अब्जाधीश आणि 'एक्स'चे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली आहे. समाज माध्यमावर याबाबतची घोषणा त्यांनी केली आहे. ट्रम्प सरकारसोबतचा माझा कार्यकाळ संपला आहे, असे त्यांनी 'एक्स'वर जाहीर केले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी इलॉन मस्क यांची अमेरिकन सरकारमध्ये विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती मस्क हे 130 दिवस ट्रम्प सरकारमध्ये होते. या कार्यकाळात सरकारचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.

ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी दिली होती. ट्रम्प यांचे सल्लागार पद सोडण्याची घोषणा एलन मस्क यांनी केल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सांयकाळी त्यांनी ही घोषणा केली.

गेल्या काही वर्षांपासून मस्क यांचे वक्तव्य अनेकदा राजकीय वाद निर्माण करत आहेत. मात्र यावेळी त्यांनी अधिक स्पष्टपणे ट्रम्प यांच्याशी संबंध तोडल्याचे सांगितल्यामुळे त्यांचा भविष्यातील राजकीय दृष्टिकोन काय असेल याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

अमेरिकन सरकारमधील विशेष कर्मचारी म्हणून माझा कार्यकाळ संपत आला आहे. सरकारचा अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो. DOGE चे ध्येय काळानुसार अधिक मजबूत होईल, असे मस्क यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांची साथ सोडण्यापूर्वी मस्क यांनी ट्रम्प यांनी आणलेले बिग ब्यूटीफुलाला विरोध केला होता. त्यात मल्टी-ट्रिलियन डॉलरसाठी टॅक्स ब्रेक आणि संरक्षण खर्च वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मस्क यांनी जाहीरपणे या बिलावर नाराजी व्यक्त केली होती.

मस्क हे ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल बिलावर नाराज असल्याचेही सांगितले जात होते. मला वाटते की बिल मोठे असू शकते किंवा ते उत्कृष्ट असू शकते. परंतु मला वाटत नाही की ते एकाच वेळी दोन्ही असू शकेल, असे मस्क यांनी म्हटले होते.

  • मस्क यांनी १३० दिवस अमेरिकन सरकारमध्ये विशेष कर्मचारी म्हणून काम केले.

  • या काळात टेस्लाला खूप मोठा फटका बसला आहे.

  • विक्री गडगडलेली असताना शेअर्सही कोसळलेले आहेत.

  • मस्क यांना DOGE चे काम पाहिल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर लक्ष देता येत नव्हते.

  • बिग ब्युटीफुलमुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT