Donald Trump News : '..म्हणून कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य बनण्याचा विचार करत आहे'; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा!

Donald Trump’s Shocking Statement on Canada : जाणून घ्या, अशी कोणती गोष्ट आहे?, जी कॅनडाला हा विचार करण्यास भाग पाडत आहे.
Trump Oath Ceremony
Trump Oath CeremonySarkarnama
Published on
Updated on

Donald Trump claims Canada may join the US as the 51st state : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी एक असाच खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य बनण्याच्या विचारात आहे. ट्रम्प यांच्या मते अमेरिका आणि कॅनडामध्ये हा करार गोल्डन डोम एअर डिफेन्स सिस्टिमबाबत होवू शकतो. जाणून घेवूया, ट्रम्प यांनी याबाबत आणखी काय म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, ‘’कॅनडाला त्यांच्या प्रस्तावित गोल्डन डोम मिसाइल सुरक्षा प्रणालीत मोफत सहभागी केले जावू शकते, परंतु ते जर अमेरिकेचे ५१ वे राज्य बनण्यास तयार असतील तर.’’

एवढच नाहीतर ट्रम्प यांनी असा इशाराही दिला आहे की, जर हे मान्य नसेल तर कॅनडाला ६१ बिलियन अमेरिकन डॉलरचा खर्च येईल. याचबरोबर ट्रम्प यांनी पुढे असाही दावा केला की, आता कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य बनण्याचा विचार करत आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यावर कॅनडाकडून तरी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Trump Oath Ceremony
Sidhu Moosewala father : सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय; पंजाब विधानसभा निवडणूक लढणार!

अशातच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पुष्टी केली होती की, त्यांचे सरकार अमेरिकेच्या प्रस्तावित गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याबाबत अमेरिकेसोबत चर्चा करत आहे. पंतप्रधान कार्नी यांनी म्हटले की, हा कॅनडासाठी एक योग्य विचार आहे का? होय, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलणं आवश्यक आहे. त्यांनी हेही म्हटले होते की, या मुद्य्यावर ट्रम्प यांच्याशी थेट चर्चा झाली आणि सध्या वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. याशिवाय कॅनडा यांनी यावरही जोर दिला की, आगामी काळात कॅनडाला संभाव्य मिसाइल धोक्यांचाही सामाना करावा लागू शकतो.

Trump Oath Ceremony
Rohini Khadse : ''आम्हाला आमच्या लाडक्या भावाकडून न्यायाची अपेक्षा होती''; रोहिणी खडसेंचा टोला!

‘गोल्डन डोम’ काय आहे? -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत अमेरिकेसाठी एका प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रोग्रामचा वादा केला होता. याच क्रमाने अमेरिकेने ‘गोल्डन डोम मिसाइल डिफेन्स शील्ड’ बनवण्याची घोषणा केली आहे. याचा अंदाजित खर्च १७५ अब्ज अमेरिकन डॉलर असणार आहे. असे मानले जात आहे की गोल्डन डोम २०२९पर्यंत तयार होईल, ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळही याच दरम्यान समाप्त होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com