Narendra Modi And Donald Trump Sarkarnama
देश

America Vs Iran War: इराणसोबत चर्चा फिस्कटली, डोनाल़्ड ट्रम्प यांनी फिरवला थेट PM मोदींनाच फोन; तब्बल 40 मिनिटं चर्चा...

Modi Trump phone call : गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण-इस्त्रायलमध्ये युध्दजन्य परिस्थिती सुरू आहे. याचा मोठा फटका जागतिक स्तरावर बसला आहे. एकमेकांवर हल्ले करण्यासोबतच धमकी देणंही सुरू आहे. तसेच युध्दबंदीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

Deepak Kulkarni

America-Iran War News: गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण-इस्त्रायलमध्ये युध्दजन्य परिस्थिती सुरू आहे. याचा मोठा फटका जागतिक स्तरावर बसला आहे. एकमेकांवर हल्ले करण्यासोबतच धमकी देणंही सुरू आहे. तसेच युध्दबंदीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. याचदरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठीच्या चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच फोन फिरवल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिका आणि इराण या दोन देशांदरम्यान युद्ध थांबवण्यासाठी चर्चेची पहिली फेरी 11 ते 12 एप्रिल या कालावधीत पार पडली. या भेटीसाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशाचे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दाखल झाले होते. तब्बल 21 तास चर्चा झाल्यानंतरही त्यातून काहीही ठोस निर्णय न झाल्यानं युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली आहे.

याचदरम्यान,आता अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी येत्या 16 एप्रिलला होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिका आणि इराणमधील चर्चेची दुसरी फेरी इस्लामाबाद किंवा जिनिव्हामध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे.

या फेरीआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन फिरवल्यानं ही मोठी घडामोड मानली जात आहे. इतकंच नव्हे,तर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

या भेटीत मोदी आणि ट्रम्प यांच्यात इराणसोबतचं युद्ध, भारत-अमेरिका संबंधावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे महिन्याभरातील मोदी आणि ट्रम्प यांच्यातला हा दुसरा फोन आहे.

पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यातील पेटलेलं युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी निवड केलेल्या हॉटेल आणि या हॉटेलचे बिलच दिले नसल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिका आणि इराण या दोन देशांदरम्यान युद्ध थांबवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. पाच देशांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी आता इराणकडून करण्यात आली आहे. सौदी अरेबिया, यूएई, कतार, बहारिन, जॉर्डनकडे ही भरपाईची मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांनी नुकसान भरपाई द्यावी, असं इराणनं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT