Jaykumar Gore VS Praniti Shinde : 'प्रणिती शिंदे मला मोठा दुश्मन समजतात; पण DPC चा निधी पाकिस्तानसाठी खर्च झाला नाही...'

DPC Fund Issue : जयकुमार गोरे यांनी डीपीसी निधीवरून प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर देत 125 कोटी सोलापुरासाठीच खर्च झाल्याचा दावा करत निधी वाटप प्रक्रियेचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
jaykumar gore-praniti shinde
jaykumar gore-praniti shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 April : प्रणिती शिंदे मला खूप मोठा दुश्मन समजतात. माझ्याबद्दल खालच्या पातळीची विधाने करतात. मात्र त्या माझ्या भगिनी आहेत. माझा त्यांना सल्ला आहे की, डीपीसीच्या निधीबाबत आपण अभ्यास करावा. तो निधी हा कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या नावे येत नसून तो विभागाच्या अनुषंगाने, सामाजिक समतोल राखण्यासाठी दिलेला असतो. डीपीसीतला 125 कोटी निधी सोलापूर शहरासाठी खर्च झालाय, पाकिस्तानासाठी नाही, असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला.

डीपीसी निधी मिळत नसल्याचे सांगून खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्याला उत्तर देताना गोरे यांनी शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत.

अशोक खरातचे एन्काउंटर होईल, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, मला माहिती नाही की त्यांना कसली आणि कशाची भीती वाटते ते. मात्र सातत्याने त्यांना भीती वाटते. अशोक खरातबाबत कोणीही तक्रार केलेली नसताना पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली आहे. चौकशीच्या विषयात कोणीही राजकारण करणे चुकीचे आहे. एवढ्या सुसंस्कृत खासदारांनी असं करू नये, असं मला वाटतं.

काँग्रेसने महिला विधेयक मंजूर केलं होतं, तर आत्ता ते विधेयक आणण्याची गरज काय होती. काँग्रेसच्या काळात न विधेयक मंजूर झाले ना अंमलबजावणी झाली. किमान महिला खासदार म्हणून तरी शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले पाहिजेत, असा टोलाही गोरेंनी प्रणिती शिंदेंनी लगावला.

ते म्हणाले, देशात लोकशाही आहे; म्हणूनच पंतप्रधानांना खालच्या भाषेत बोलू शकता. मात्र ते सत्तेत असले की लोकशाही आणि विरोधात गेले की लोकशाहीची हत्या. हे म्हणजे लोकशाही, असे प्रणिती शिंदे यांना वाटतं

jaykumar gore-praniti shinde
Solapur Shivsena Dissolved : श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर : दौरा संपताच माढा, सोलापूर शिवसेना कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय

तेव्हाच अधिकाऱ्यांची शंका आली होती...

अशोक खरात याच्या जमीन खरेदीबाबत गोरे म्हणाले, महामार्ग कुठून जातात, याबाबत कॅबिनेट आणि अनेक ठिकाणी चर्चा होत असते. या लोकांना झटपट पैसा कुठून मिळणार, हे माहिती असतं. ते लोक अशा व्यवस्थेत सहभागी होतात आणि अशा गोष्टींचा लाभ घेतात. शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलण्यावेळी अनेक अधिकाऱ्यांनी विरोध केला होता, त्यामुळे शंका उपस्थित झाली की संबंधित अधिकाऱ्यांनी इथे जमिनी खरेदी केल्या की काय?

बदली झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा कळवळा

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतःहून नागपूरला बदली करून घेतली, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले होते. त्याबाबात गोरे म्हणाले, काँग्रेसचीच विकेट पडली आहे, त्यामुळे त्यांना तसं वाटतं. दोन वर्ष सात महिने जिल्हाधिकाऱ्यांना झाले. त्यांचा कार्यकाळ संपलेला होता, त्याच्यापेक्षा अधिक काम त्यांनी केलं. स्वतःहून त्यांनी बदली मागून घेतली, माझे त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बदली करून गेल्यानंतर आपल्याला कळवळा आला. ते असताना आपण काय काय केलं? याची आपल्याला माहिती आहे. पण, त्याबद्दल मी बोलणार नाही, असेही गोरे यांनी शिंदे यांना सुनावले.

मिरवणुकीलाही मी सोलापुरात येतोय

सोलापुरात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेण्याचा एक वेगळा आनंद आहे. रविवारी सांगता मिरवणुकीला मी येणार आहे. राज्यातील सर्वात मोठी मिरवणूक सोलापुरात निघते, असेही गोरे यांनी नमूद केले.

शिस्त समोरच्यांनीही पाळावी

सोलापूर महापालिकेतील बहुतांश सदस्य हे नव्याने निवडून आलेले आहेत. मोजके सदस्य वगळले तर सर्व सदस्य नवीन आहेत, ज्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. कामकाजाबद्दल आमच्या पक्षाकडून आम्ही आमच्या सदस्यांना प्रशिक्षण देणार आहोत. ज्यावेळी कामकाजाचे प्रशिक्षण देतोय, त्याचवेळी शिस्तीचे देखील धडे देऊ, पण शिस्त पाळण्याची जबाबदारी समोरच्या लोकांचीही आहे, असा टोलाही त्यांनी शिंदेसेनेच्या नगरसेवकांना लगावला.

jaykumar gore-praniti shinde
Gore Reply Bhalke : जयकुमार गोरेंचा गर्भित इशारा : ज्या दिवशी डोक्यावरून पाणी जाईल; त्या दिवशी भगीरथ भालकेंचं सगळंच काढेन

कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही

मुंबई ड्रग्स प्रकरण गंभीर आहे. त्यावर पोलिस सातत्याने कारवाई करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कडक सूचना दिल्यात की, या प्रकरणात कोणी कोणाला पाठीशी घातलं, तर त्याच्यावरही कारवाई करा. ड्रग्स ही देशाला आणि समाजाला लागलेली कीड आहे, असे गोरे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com