Sheikh Hasina Sarkarnama
देश

Sheikh Hasina and America : बांगलादेशचे सरकार पाडण्यामागे कुणाचा हात? ; शेख हसीना यांच्या आरोपांना अमेरिकेने दिलं उत्तर, म्हटलं...

Bangladesh Politics News : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्य्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पद आणि देशही सोडलेला आहे.

Mayur Ratnaparkhe

Bangladesh Violence and America : बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनामुळे सत्तापालट झाली. शेख हसीना यांना पंतप्रधान पद आणि देशही सोडावा लागला. त्यानंतर त्यांनी बांगालदेशातील सरकार पाडण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचं म्हटल्याचंही माध्यमांवर आलं होतं. दरम्यान आता या सगळ्या आरोपांवर आणि बांगलादेशातील एकूणच राजकीय परिस्थितीवर अमेरिकेनेही उत्तर दिलं आहे.

अमेरिकेने म्हटले आहे की, बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार हटवण्यामागे त्यांचा हात नाही. याचबरोबर अमेरिकेने त्या आरोपांना हास्यास्पद आणि खोटे ठरवले आहे. ज्या आरोपांमध्ये म्हटलं गेलं होतं, की शेख हसीना यांना पंतप्रधानावरून हटवण्यासाठी अमेरिकेकडून षडयंत्र रचलं गेलं होते.

शिवाय अमेरिकेकडून असंही सांगण्यात आलं आहेलं की, आम्ही बांगालदेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मानवधिकाराच्या मुद्य्यावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे सुरूच ठेवतील.

बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याआधी आणि ढाका येथील शासकीय निवास्थानातून निघून देश सोडण्यापूर्वी शेख हसीना या देशाला संबोधित करू इच्छित होत्या, अशी माहिती समोर आलेली आहे. विशेष करून त्या आंदोलकांना, ज्यांच्या आंदोलनामुळे त्यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं. आंदोलक त्यांच्या दरवाज्यापर्यंत पोहचले होते आणि देशाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला होता.

द इकोनॉनिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार आता भारतात असणाऱ्या शेख हसीना(Sheikh Hasina) आपल्या निकटवर्तीयांशी त्या भाषणाबाबत बोलल्या आहेत, जे त्यांना देता आलेलं नाही. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, शेख हसीना यांनी अमेरिकेवर बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाचे षडयंत्र रचल्याचाही गंभीर आरोप केला आहे आणि जर त्यांना भाषणाची संधी मिळाली असती, तर त्यांनी हे बांगलादेशातील जनतेला भाषणातून सांगितलं असतं.

शेख हसीना यांचा अमेरिकेवरील नेमका आरोप -

मीडियामधील रिपोर्टनुसार 'खरंतर मी सत्तेत राहू शकली असती, जर मी सेंट मार्टिन बेटाची सार्वभौमत्व अमेरिकेच्या स्वाधीन केले असते आणि त्यांना बंगालच्या उपसागरात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करू दिले असते तर. मी माझ्या भूमीतील जनतेला विनंती करते की, कृपया कट्टरपंथीयांच्या भूलथापांना बळी पडू नका.' असं शेख हसीना यांनी म्हटलेलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT