Sheikh Hasina News : शेख हसीना म्हणतात 'मी लवकरच पुन्हा येईन' ; अमेरिकेवरही केला 'हा' गंभीर आरोप!

Sheikh Hasina Last Speech : जाणून घ्या, देश सोडण्यापूर्वीचं शेख हसीना यांचं ते भाषण जे कधीही नाही होऊ शकलं सार्वजनिक
Sheikh Hasina
Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

Sheikh Hasina accuses America : बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याआधी आणि ढाका येथील शासकीय निवास्थानातून निघून देश सोडण्यापूर्वी शेख हसीना या देशाला संबोधित करू इच्छित होत्या. विशेष करून त्या आंदोलकांना, ज्यांच्या आंदोलनामुळे त्यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं. आंदोलक त्यांच्या दरवाज्यापर्यंत पोहचले होते आणि देशाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला होता.

द इकोनॉनिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार आता भारतात असणाऱ्या शेख हसीना(Sheikh Hasina) आपल्या निकटवर्तीयांशी त्या भाषणाबाबत बोलल्या आहेत, जे त्यांना देता आलेलं नाही. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, शेख हसीना यांनी अमेरिकेवर बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाचे षडयंत्र रचल्याचाही गंभीर आरोप केला आहे आणि जर त्यांना भाषणाची संधी मिळाली असती, तर त्यांनी हे बांगलादेशातील जनतेला भाषणातून सांगितलं असतं.

Sheikh Hasina
Nahid Islam and Asif Mahmood News : बांगलादेशातील सत्ता परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या आंदोलनातील दोन विद्यार्थी नेते बनले थेट मंत्री!

जवळच्या सहकऱ्यांना पाठवण्यात आलेल्या एका संदेशात शेख हसीना यांनी म्हटले की, मी राजीनामा दिला, कारण मला मृतदेहांचा जुलूस पाहावा लागू नये. त्यांना(विरोधकांना) विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवरून सत्तेत यायची इच्छा होती. मात्र मी यासाठी परवानगी दिली आणि पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

खरंतर मी सत्तेत राहू शकली असती, जर मी सेंट मार्टिन बेटाची सार्वभौमत्व अमेरिकेच्या स्वाधीन केले असते आणि त्यांना बंगालच्या उपसागरात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करू दिले असते तर. मी माझ्या भूमीतील जनतेला विनंती करते की, कृपया कट्टरपंथीयांच्या भूलथापांना बळी पडू नका.

Sheikh Hasina
Obaidul Hasan News : बांगलादेशात आंदोलकांसमोर सरन्यायाधीशही हतबल ; ओबैदुल हसन यांना द्यावा लागला राजीनामा!

जर मी देशात राहिले असते, तर आणखी जीव गेले असते, आणखी नासधूस झाली असती. मी बाहेर पडण्याचा अतिशय कठीण निर्णय घेतला. मी तुमची नेता बनले कारण तुम्हीच मला निवडलं, तुम्हीच माझी ताकद होता. तसेच, अवामी लीगच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे आणि म्हणाल्या आहेत की, मी लवकरच परत येईन. अवामी लीग वारंवार उभा राहिली आहे. मी बांगलादेशाच्या भविष्यासाठी सदैव प्रार्थना करेन.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com