Champai Soren Sarkarnama
देश

Champai Soren : अखेर चंपई सोरेन यांचं ठरलं; मनातलं सगळं सांगत घेतला मोठा निर्णय...

Jharkhand mukti Morcha Hemant Soren JMM : मागील काही दिवसांपासून चंपई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Rajanand More

New Delhi : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी अखेर मोठा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून ते झारखंड मुक्ती मोर्चामध्ये नाराज होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. रविवारी त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करून मनातलं सगळं सांगून टाकत हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंपई सोरेन रविवारी सकाळीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत जेएमएमचे तीन आमदार असल्याचेही सांगितले जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पक्षापासून दुरावल्याची चर्चा होती. तसे अप्रत्यक्ष संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले होते. चंपई सोरेन यांनी आपल्या सोशल मीडियावरील जेएमएमचा उल्लेखही काढला आहे.

काय म्हटले आहे चंपई सोरेन यांनी?

चंपई सोरेन यांनी सोशल मीडियात पोस्ट करून झारखंड मुक्ती मोर्चातून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्यासमोर तीन पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजकारणातून संन्यास स्वत:ची संघटना स्थापन करणे आणि इतर पक्षात प्रवेश करणे असे तीन पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाने कार्यक्रम थांबवले

आमदारांच्या बैठकीसाठी अचानक आपल्याला कल्पना न देता कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगत चंपई सोरेन यांनी म्हटले आहे की, माझे दोन दिवसांचे कार्यक्रम अचानक स्थगित करण्यात आले. एका मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना अन्य व्यक्त रद्द करतो, यापेक्षा अपमानजनक दुसरे काय असू शकते. या प्रकारामुळे चार दशकांतून पहिल्यांदाच आतून खचलो, अशी भावना चंपई सोरेन यांनी व्यक्त केली आहे.

आमदारांच्या बैठकीचा अजेंडाही मला देण्यात आला नव्हता. बैठकीत थेट माझ्याकडे राजीनामा मागण्यात आला. मला आश्चर्य वाटले. मला सत्तेचा मोह नसल्याने लगेच राजीनामा दिला. पण आत्मसन्मान दुखावला होता. पक्षात माझे काहीच स्थान नाही, असे वाटत वाटले. ज्या पक्षासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या पक्षात आपले काहीच अस्तित्व नाही, असे वाटले, असे चंपई सोरेन यांनी म्हटले आहे.

आमदारांच्या त्याच बैठकीत मी म्हटले होते की, ‘आजपासून माझ्या जीवनातील नवा अध्याय सुरू होत आहे.’ माझ्याजवळ तीन पर्याय आहे. पहिला, राजकारणातून संन्याल घेणे, दुसरा, स्वतंत्र संघटना काढणे आणि तिसरा, या प्रवासात इतर साथीदार मिळाला तर त्यांच्यासोबत जाणे. त्यादिवसापासून आतपर्यंत आणि आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व पर्याय खुल असल्याचे चंपई सोरेन यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT