Mumbai : एकेकाळी आदित्य ठाकरेंचे अत्यंत खासमखास असलेल्या राहुल कनाल यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा विश्वास दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदावर कनाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल कनाल यांनी काही महिन्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून शिंदेच्या सेनेत प्रवेश केला आहे. त्यांना युवा सेनेचे सरचिटणीस हे पद देण्यात आले होते. त्यानंतर आता पुढील काही महिन्यांपवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षाच्या सोशल मीडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कनाल हे आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. मातोश्रीच्या जवळचे युवा नेते म्हणून कनाल यांची ओळख होती. आय लव्ह मुंबई फाऊंडेशनचे ते अध्यक्ष असून या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळखही निर्माण केली आहे.
कनाल यांची बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातही चांगली ओळख आहे. सोशल मीडियाचे प्रमुखपद देत शिंदे यांनी एकप्रकारे ठाकरे यांना धक्का दिला आहे. पुढील काही दिवसांत विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया हे प्रचाराचा मोठे साधन असते. त्यामुळे सर्वच पक्षांकडून हा सेल अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे यांनीही कनाल यांना ही जबाबदारी देत हे सेल सक्रीय करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जागांचा विचार केला तर उध्दव ठाकरे यांनी शिंदेवर मात केली आहे. तर स्ट्राईक रेटनुसार शिंदे वरचढ ठरले आहेत. आता विधानसभा निवडणुकीत खरी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरे विरुध्द शिंदे हा सामना किती मतदारसंघात पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे जागावाटपात कोणता गट किती जागा मिळवण्यात यशस्वी ठरतोय, हेही पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.