Amit Jogi  Sarkarnama
देश

NCP leader murder case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकाला जन्मठेप; हायकोर्टाने 23 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सुनावली शिक्षा

Amit Jogi life sentence, Ramavatar Jaggi murder case : रायूपर यथील विशेष सीबीआय कोर्टाने अमित जोगी यांना २००७ मध्ये निर्दोष ठरविले होते. त्याविरोधात सीबीआयने हायकोर्टात याचिका केली होती.

Rajanand More

Political murder case india : छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र माजी आमदार अमित जोगी यांना एका हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राम अवतार जग्गी यांच्या हत्याकांडामध्ये जोगी यांना दोषी धरण्यात आले आहे. छत्तीसगढ हायकोर्टाने त्यांच्यावरील आरोप गुरूवारी निश्चित करण्यात आले होते. सोमवारी जोगी यांना शिक्षा ठोठावण्यात आली.

छत्तीसगढमध्ये २००३ मध्ये जग्गी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तब्बल २३ वर्षांनंतर हायकोर्टात याप्रकरणाचा निकाल लागला आहे. हायकोर्टाचे मुख्य न्यायमुर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने सीबीआयने दाखल केलेले अपील मान्य करत विशेष कोर्टाचा निकाल रद्द केला. अमित जोगी हे माजी आमदार आहेत. जग्गी यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे वडील अजित जोगी हे छत्तीसगढचे मुख्यमंत्री होते.

रायूपर यथील विशेष सीबीआय कोर्टाने जोगी यांना २००७ मध्ये निर्दोष ठरविले होते. त्याविरोधात सीबीआयने हायकोर्टात याचिका केली होती. हायकोर्टाने सीबीआय कोर्टाचा निकाल फिरवला आहे. सीबीआय कोर्टाने पुराव्यांअभावी जोगी यांची निर्दोष मुक्तता करताना अनय २८ जणांना दोषी ठरविले होते. हायकोर्टाने आपल्या आदेशामध्ये जोगी हे मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट केले. एका साक्षीच्या आधारे काही आरोपांना शिक्षा देणे आणि मुख्य आरोपीला सोडणे, न्यायसंगत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्तीसगढमधील नेते राम अवतार जग्गी यांची ४ जून २००३ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जोगी यांच्यासह एकूण ३१ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यापैकी दोघे जण सरकारी साक्षीदार बनले होते. जग्गी यांचे पुत्र सतीश जग्गी यांनी सीबीआय कोर्टाच्या निकालाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. कोर्टाने हायकोर्टाकडे हे प्रकरण पुनर्विचारासाठी पाठविले होते.

रामावतार जग्गी हे व्यावसायिकही होते. माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांचे ते निकटवर्तीय होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी शुक्ल हे शरद पवार यांच्यासोबत आल्यानंतर जग्गी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. छत्तीसगढ राष्ट्रवादी काँग्रेसचे ते कोषाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT