Jagdeep Dhankhar news : जगदीप धनखड यांनी चक्रं फिरवली अन् भाजपचा पराभव? तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकीय समीकरणं बदलली...

Haryana Rajya Sabha election news : जगदीप धनखड हे हरियाणात प्राबल्य असलेल्या जाट समाजातील नेते आहे. ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर भाजपने त्याचा बराच गवगवा केला होता.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharSarkarnama
Published on
Updated on

India politics updates 2026 : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला अन् देशाच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले. सुरूवातीला त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते. पण नंतर धनखड यांनी या कारणावर फुली मारत वादाला फोडणी दिली. राज्यसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा धनखड चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

हरियाणातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालात धनखड यांची भूमिका महत्वाची राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हरियाणात दोन जागांसाठी निवडणूक झाली. या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत भाजपचे संजय भाटिया आणि काँग्रेसचे कर्मवीर सिंह बौध्द यांचा विजय झाला. पण बौध्द यांना विजय भाजपसाठी चांगलाच जिव्हारी लागला आहे.

बौध्द यांना विजयासाठी निकराची लढत द्यावी लागली. त्यांच्या विरोधात होते भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार सतीश नांदल. त्यांच्या विजयासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यात भाजपला यशही आले होते. काँग्रेसचे पाच मते फुटल्याने बौध्द यांचा निसटता विजय झाला. आता यामध्ये धनखड यांची भूमिका कशी महत्वाची ठरली? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या राजीनाम्यात दडल्याची चर्चा आहे.

Jagdeep Dhankhar
Baramati Election News : बारामती निवडणुकीत 1991 ची पुनरावृत्ती होणार; अजितदादा ते सुनेत्रा पवार, जाणून घ्या हा इतिहास...

धनखड हे हरियाणात प्राबल्य असलेल्या जाट समाजातील नेते आहे. ते उपराष्ट्रपती झाल्यानंतर भाजपने त्याचा बराच गवगवा केला होता. निवडणुकीमध्येही भाजपने त्याचा प्रचार केला होता. पण धनखड यांना ज्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागला, त्यातून चुकीचा संदेश जाट समाजात गेल्याचे सांगितले जाते. अद्याप धनखड त्यावर उघडपणे बोलले नसले तर राज्यसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटल्याची चर्चा आहे.

हरियाणामध्ये इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाचीही ताकद आहे. मागील सरकारमध्ये ते भाजपसोबत सत्तेत होते. पण नंतरच्या निवडणुकीत त्यांची दाणादाण उडाली. सध्या त्यांचे दोन आमदार आहे. पक्षाने राज्यसभा निवडणुकीतून अंग काढून घेतले होते. मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यामध्येच धनखड यांची भूमिका महत्वाची मानली जाते. धनखड आणि लोकदलाचे प्रमुख चौधरी अभय सिंह चौटाला यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते.

Jagdeep Dhankhar
Top 10 News : अखेर हाकेंचं ठरलं, बारामतीत 1991 ची पुनरावृत्ती होणार, तनपुरेंच्या ‘एकला चलो’ने समीकरणं ढवळली, खरात प्रकरणात मुंबईतील हॉटेलची माहिती उघड... वाचा महत्वाच्या घडामोडी

धनखड यांनी पडद्यामागून सुत्रं हलवल्याचीही जोरदार चर्चा आहे. चौटाला यांनी जाट समाजातील उपराष्ट्रपतिपदावरील व्यक्तीबाबत झालेल्या घटनेवरून निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. पक्षाच्या दोन आमदारांनी नांदल यांच्या बाजुने मतदान केले असते तर भाजपचा आणखी एक उमेदवार निवडून आला असता.

बिहार आणि ओडिशामध्ये भाजपने विरोधकांचे आमदार फोडत राज्यसभेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. हरियाणामध्येही तशी फिल्डींग लावण्यात आली होती. भाजपने काँग्रेसचे पाच आमदार फोडले. पण जुन्या मित्रपक्षाची मनधरणी करण्यात भाजपला अपयश आले. हीच भाजपची डोकेदुखी ठरली, आणि त्यास जगदीप धनखड यांची भूमिका महत्वाची ठरल्याची चर्चा हरियाणाच्या राजकीय वर्तुळात आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com