Annamalai, Narendra Modi Sarkarnama
देश

Amit Shah : आक्रमक नेते अण्णामलाई यांना दिल्लीत मोठं पद; थेट अमित शहांनीच दिले संकेत...

K Annamalai’s Role in Tamil Nadu Leadership : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांच्यासारख्या लढवय्या नेत्याला संघटनेपासून दूर ठेवणे भाजपला परवडणारे नाही.

Rajanand More

Tamil Nadu Politics : भाजपचे तमिळनाडू येथील आक्रमक नेते के. अण्णामलाई यांना काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अण्णा द्रमुकशी युती केल्यानंतर अण्णामलाई पदावरून पायउतार झाले. मात्र, तेव्हापासून त्यांना भाजपमध्ये कोणतेही पद देण्यात आलेले नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांच्यासारख्या लढवय्या नेत्याला संघटनेपासून दूर ठेवणे भाजपला परवडणारे नाही. याबाबत पक्षातही नाराजी वाढत असल्याची चर्चा होती. या चर्चा सुरू असतानाच अण्णामलाई यांच्यावर दिल्लीत मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच दिले आहेत.

शाह यांनी तमिळनाडूतील एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अण्णामलाई हे राज्यात महत्वाची भूमिका बजावतील. तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, असे शहांनी स्पष्ट केले आहे.

अण्णामलाई यांना तमिळनाडूबाहेर मोठी जबाबदारी देण्याबाबत शहा यांनी पहिल्यांदाच असे विधान केलेले नाही. त्यांनी पद सोडल्यानंतरही शहांनी एक्सवर एक पोस्ट करत तसे संकेत दिले होते. अण्णामलाई यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर फायदा करून घेतला जाईल, असे शाह म्हणाले होते.

तमिळनाड़ूमध्ये भाजप व अण्णा द्रमुक युतीचे सरकार येईल, असा दावाही शहांनी या मुलाखतीत केला आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा अण्णा द्रमुकमधील असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस व माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचे थेट नाव घेण्याचे टाळले.

तमिळनाडूमध्ये भाजपला एकदाही सत्ता मिळालेली नाही. आता अण्णा द्रमुकशी युती केल्यानंतर पुन्हा भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वीही भाजपने युती केली होती. मात्र, त्यांना बहुमताच्या जवळपासही जाता आले नव्हते. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत युतीला बहुमत मिळेल, असा विश्वास शहांकडून सातत्याने व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT