Raj Thackeray Vs BJP : भाजपला धक्का; राज ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा देत पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Raviraj Botale Resigns from BJP Post : उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील मराठीप्रेमींनी हिंदी सक्तीविरोधात उभे राहावे, असे आवाहन गुरूवारी केले होते. राज ठाकरेंची भूमिकाही तीच आहे.
Raviraj Botale steps down from his BJP post after openly backing Raj Thackeray’s political rally, triggering a wave of speculation.
Raviraj Botale steps down from his BJP post after openly backing Raj Thackeray’s political rally, triggering a wave of speculation. Sarkarnama
Published on
Updated on

Support for Raj Thackeray’s Rally Sparks Internal Dissent : राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या 5 जुलैला याविरोधात ते मोर्चाही काढणार आहेत. सर्व मराठीप्रेमींना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता भाजपमधूनही या मोर्चाला पाठिंबा मिळू लागला आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील मराठीप्रेमींनी हिंदी सक्तीविरोधात उभे राहावे, असे आवाहन गुरूवारी केले होते. राज ठाकरेंची भूमिकाही तीच आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी रविराज बोटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे त्यांच्या मोबाईलचे स्टेटस सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या स्टेट्सचा स्क्रीनशॉट अनेकांनी शेअर करत बोटले यांचे स्वागत केले आहे.

कोण आहेत रविराज बोटले?

रविराज बोटले हे पेशाने वकील आहेत. त्यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार ते भाजपच्या दिवा शीळ मंडल कायदा सेलचे संयोजक आहे. या पदाचाच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात पहिलीपासून हिंदी लादण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षा – दिवा शिळ मंडळ कायदा सेल संयोजक या पदाचा राजीनामा देत आहे.

Raviraj Botale steps down from his BJP post after openly backing Raj Thackeray’s political rally, triggering a wave of speculation.
Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’मध्ये पवारांना 28 वर्षांपूर्वी पहिला धक्का देणारी 'अण्णा-काका' जोडी फुटली...

राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला एक मराठी माणूस म्हणून माझा जाहीर पाठिंबा असून, 5 जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चात मी सहभागी होईन, असे बोटले यांनी म्हटले आहे. बोटले यांचा नावाचा हा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत असून अनेकांकडून शेअर केला जात आहे.

Raviraj Botale steps down from his BJP post after openly backing Raj Thackeray’s political rally, triggering a wave of speculation.
Gujarat AAP News : विजयाचा गुलाल उडण्याआधीच 72 तासांत 'आप'ला धक्का; गुजरातमधील आमदाराची हकालपट्टी...

दरम्यान, राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे हेही सहभागी होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यामुळे या मोर्चाला आता वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी मुद्द्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच मोर्चात एकत्र येणार असल्याने ते निवडणुकीतही युती करणार का, या चर्चांना उधाण आले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com