amit shah Sarkarnama
देश

Caste Based Census : जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध नाही, पण... ; अमित शाहांचं मोठं विधान

Amit Shah On Caste Based Census : जातीनिहाय जनगणनेसाठी विरोधी पक्षांचा दबाव वाढत आहे. आता अमित शाहांनी याबाबत मोठं विधान केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

Sachin Fulpagare

Assembly Elections 2023 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडतो आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाहा यांनी जातीनिहाय जनगणनेबाबत मोठं विधान केलं आहे.

देशाच्या राजकारणातील अतिशय कळीचा मुद्दा म्हणजे जातीनिहाय जनगणना. विरोधी पक्षांकडून सतत ही मागणी होत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नितीशकुमार यांच्यासह सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून लावून धरली आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतही हा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आज छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. यानवेळी अमित शाहा यांनी जातीनिहाय जनगणनेबाबत मोठं विधान केलं. 'भाजपचा हा फक्त जाहीरनामा नाही, तर एक संकल्प आहे. आणि आमचा जातीनिहाय जनगणनेस विरोध नाही. आम्ही सर्वांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ', असं अमित शाह म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'भाजपचा फक्त जाहीरनामा नसतो, तर तो एक संकल्प असतो. आणि त्याच संकल्पातून भाजपने छत्तीसगड राज्याची स्थापना केली होती. १५ वर्षे रमणसिंह यांच्या नेतृत्वात सरकार चाललं होतं. आता छत्तीसगडची जनता पुन्हा परिवर्तन घडवेल. मागासलेल्या राज्यांचा विकास करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीनेच आम्ही काम करतोय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही छत्तीसगडचा विकास करू, असं आश्वासन अमित शाह यांनी या वेळी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT