Rajasthan Election 2023 : अशोक गेहलोत, सचिन पायलट यांना टक्कर देण्यासाठी भाजपचे तगडे उमेदवार मैदानात

CM Ashok Gehlot, Sachin Pilot : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच
CM Ashok Gehlot, Sachin Pilot
CM Ashok Gehlot, Sachin Pilot Sarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Election News : राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. या निवडणुकीकडे मिनी लोकसभेची निवडणूक म्हणून पाहिले जात असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांची तिसरी यादी घोषित केली असून, यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या विरोधातील उमेदवार फायनल केले आहेत.

CM Ashok Gehlot, Sachin Pilot
Rajasthan Politics : राजस्थानातील बस्ती मतदारसंघात माजी आयएएस-आयपीएस अधिकारी आमने-सामने; नातेवाइकात चुरशीची लढत

भाजपने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून महेंद्र सिंह राठोड यांना उमेदवारी दिली, तर टोंक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सचिन पायलट यांच्याविरोधात अजित सिंह यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही सीटवरील निवडणुकीची चर्चा संपूर्ण राजस्थानात आहे. त्यामुळे या दोघांविरोधात कोण उमेदवार दिले जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहाेचली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुरुवारी भाजपने ५८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी पहिल्या यादीत भाजपने ९५ जणांची नावे घोषित केली होती. आतापर्यंत एकूण १८२ जणांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने आतापर्यंत १५१ जागेवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपने तिसऱ्या यादीत करणपूर मतदारसंघातून सुरेंद्र पाल यांना, तर सुरतगड मतदारसंघातून रामप्रताप कनेसिया यांना उमेदवारी दिली आहे. खाजुवाला मतदारसंघातून विश्वनाथ मेघवाल यांना, तर कोलायातमधून पूनम कवर, सादलापूरमधून सुमित्रा पुनिया आणि पिलानीमधून राजेश दहिया यांना रिंगणात उतरवले आहे.

Edited By- Ganesh Thombare

CM Ashok Gehlot, Sachin Pilot
Manoj Jarange Patil:'...तोपर्यंत घराचा उंबरा शिवणार नाही'; 2 जानेवारीनंतर मुंबईत धडकणार मराठ्यांचे वादळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com