Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah Fake Video : शाहांच्या फेक व्हिडिओप्रकरणी जिग्नेश मेवानींचा पीए आणि आप नेत्याला अटक

Rajanand More

Gujarat News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामध्ये ते एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपवणार असल्याचे शाह सांगत असल्याचे दिसत होते. पण हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आहे. या प्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस यंत्रणांकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अमित शाह (Amit Shah) यांच्या व्हिडिओप्रकरणी सोमवारी आसाममधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तसेच तेलंगणाचे मुख्यंमत्री रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांना एक मेला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यानंतर गुजरात (Gujarat) पोलिसांनीही आज मोठी कारवाई केली आहे.

अहमदाबाद सायबर क्राईम टीमने आज दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांचे विभागीय कार्यालय सांभाळणारे सतीश वनसोला आणि आम आदमी पक्षाचे दाहोद जिल्हाध्यक्ष आर. बी. बारिया यांचा समावेश आहे. दोघांनी शाहांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केल्याचा आरोप आहे.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अनेकांना या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. अनेक राज्यांमध्ये पोलिसांकडून तपास केला जात आहे. शाहांच्या एटिडेट व्हिडिओचा तपास झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, नागालँड, तेलंगणा आदी राज्यांमध्ये दिल्ली पोलिसांनी टीम पाठवली आहे. सर्वाधिक नोटीस काँग्रेसच्या नेत्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अमित शाह यांनी फेक व्हिडिओप्रकरणी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष खोटी माहिती पसरवून लोकांना भ्रमित करत आहे. भाजप एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचा समर्थक असून नेहमीच आरक्षणाच्या संरक्षकाची भूमिका निभावेल. नरेंद्र मोदीही हे अनेकदा बोलले आहेत. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणावर कोणत्या पक्षाने दरोडा टाकला असेल तर तो काँगेस पक्ष आहे, अशी टीका शाहांनी केली आहे.      

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT