New Delhi News : मागील वर्षी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या (Manipur Violence Case) घटना घडल्या होत्या. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओही यादरम्यान मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेची सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यात मागील वर्षी तीन मेला दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. कुकी झोमी समाजातील या दोन महिलांची धिंड काढण्यापूर्वी त्यांनी पोलिसांच्या (Police) वाहनाचा आसरा घेतला होता. त्यांच्यासोबत दोन पीडित पुरुषही होते. पण पोलिसांनी वाहनाची चावी नसल्याचे कारण देत तिथे थांबून राहिले. पीडितांनी अनेकदा याचना करूनही पोलिस नुसते पाहत राहिले. वाहनाच्या दिशेने जमाव आल्यानंतर पोलिस पसार झाले, असे सीबीआयच्या (CBI) आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये पोलिसांकडे बोट दाखवण्यात आले असून, त्यांनाच मुख्य आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे प्राथमिक तपासात दिसते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे. पोलिस घटनास्थावरून पळून गेल्यानंतर जमावाने महिलांना वाहनातून बाहेर काढत त्यांची नग्न धिंड काढली. पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती तर महिलांना वाचवता आले असते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुवाहाटी येथील विशेष न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा जण आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात ऑक्टोबरमध्येच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आधीच पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, फौजदारी कारवाईबाबत मणिपूरचे डीजीपी राजीव सिंह यांनी बोलण्यास नकार दिल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.
महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ जुलै 2023 मध्ये व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले होते. दोन महिलांपैकी एक महिला 20 वर्षीय तर एक महिला 40 वर्षीय होती. जमावातील काही पुरुष महिलांवर लैंगिक अत्याचार करताना व्हिडिओत दिसत होते. मणिपूरमधील इतर भागांतही मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.