Delhi Blast Amit Shah .jpg Sarkarnama
देश

Amit Shah On Delhi Blast: दिल्ली पुन्हा टार्गेट..? गृहमंत्री अमित शाह यांची कार स्फोटानंतर पहिली मोठी रिअ‍ॅक्शन समोर, म्हणाले...

Amit Shah reaction Delhi Red Fort Blast: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. एका धीम्या गतीनं धावत असलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक लोक यात जखमी झाले आहेत.

Deepak Kulkarni

New Delhi News : दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. एका धीम्या गतीनं धावत असलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक लोक यात जखमी झाले आहेत. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं असून केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी यास्फोटप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. याचदरम्यान, अमित शाह हे घटनास्थळी पोहोचले असून जखमींची विचारपूस करण्यासाठी त्यांनी रुग्णालयात दाखल झाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मेट्रो स्टेशनजवळ एका आय ट्वेन्टी कारमध्ये हा स्फोट झाला. यानंतर सुरक्षा यंत्रणांची पथकं ही दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. माझी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशीही चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी तपास यंत्रणांना सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहे. थोड्याच वेळात अमित शाह घटनास्थळी जाणार असून जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातही ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एक ह्युंडाइ आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटांत दिल्ली स्पेशल पोलीस पथक, दिल्ली क्राइम ब्रांच घटनास्थळी दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या स्फोटात जवळून जाणाऱ्या काही लोकांना दुखापत झाली आहे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे.

तसेच NSG आणि NIA च्या टीमनेही फॉरेन्सिक टीमसह FSL स्फोटाचा तपास सुरु केला आहे. परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या स्फोटात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याचंही अमित शाह यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मी दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याचंही त्यांनी म्हटलं.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही विचार करत सर्वच बाजूंनी विचार कारत तपास सुरू आहे. चोहोबाजूंनी तपास सुरू असून लवकरच देशाच्या जनतेपुढे या घटनेची संपूर्ण माहिती ठेवण्यात येईल, असेही अमित शाह यांनी सांगितलं.

दिल्ली स्फोटात वापरलेली कार हरियाणातली असल्याचं समोर आलं आहे. ही कार नदीम खान या व्यक्तीच्या नावानं नोंदणीकृत असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारची माहिती समोर आल्यानं आता तपासाची सूत्रे वेगानं फिरण्यास मदत होणार आहे.

दिल्लीतील या स्फोटाच्या घटनेनंतर बिहार,महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,हरयाणा या राज्यांसह देशातील मुंबई,पुणे यांसह प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच ठिकाणी नाकाबंदी सुरू असून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT