Amit Shaha Gourav Gogoi Sarkarnama
देश

Amit Shah On Gogoi: अमित शाह गोगाईंवर प्रचंड भडकले; लोकसभेत या दोघात नेमकं काय घडलं?

Parliament No Trust Motion Updates: "पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा झाली ते आम्हाला सांगू शकता का?"

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच सभागृहात मंगळवारी सकाळी प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्या एका वक्तव्यानंतर गृहमंत्री अमित शहा चांगलेच संतापले. यावेळी शाह यांनी गोगोईंना आव्हानही दिले. यामुळे काही संसदेत जोरदार घमासानही सुरू झाले होते. (Latest Marathi News)

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते गौरव गोगोई इशारा करत म्हणाले की, 'तुमच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काय चर्चा झाली ते आम्हाला सांगू शकता का? यावर अमित शहा प्रचंड संतापले. गोगाईंना यावर प्रत्युत्तर देताना अमित शाह म्हणाले, तुम्हीच सांगा काय म्हणाले, हा गंभीर आरोप आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करता येणार नाही. यानंतर इतर सदस्यांनी गोगाई यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असे बोलू नये असे सांगितले, यामुळे तणाव काही प्रमाणात निवळला.

सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात विरोधकांवर हल्लाबोल करताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप केला. ज्यात तथ्य नाही, असे भाष्य करू नये, अशी तंबी गोगाईंना दिली. महत्त्वाच्या विषयावर चर्चा. आपण सर्वांनी सभागृहाच्या अधिवेशनानुसार बोलूया. अविश्वास प्रस्ताव हा एक गंभीर प्रस्ताव आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घ्या, असे बिर्ला म्हणाले.

गोगाईंनी केली प्रश्नांची सरबत्ती -

"मोदी मणिपूरला का गेले नाहीत? मोदी मणिपूर वर का बोलत नाहीत ? बोलले तर 37 सेकंद का एवढाच वेळ का बोलले? बाकी मंत्री बोलतील पण मोदी का बोलत नाहीत? मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का काढून टाकल नाही ? बाकी राज्यात आपण मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का बदललं नाही?" अशा प्रश्नांचीही सरबत्ती गौरव गोगाई यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT