Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah News: गृहमंत्री अमित शहांचं 'हायपॉवर डेमोग्राफी मिशन': मोदी सरकारचा घुसखोरांना धडकी भरवणारा प्लॅन समोर

High Power Demography Mission: केंद्र सरकार आता देशातील भाजपशासित पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांबाबत कठोर धोरण राबवण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात घोषणा केलेल्या 'हाय-पॉवर डेमोग्राफिक मिशन'अॅक्टिव्ह केल्याचं दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात देशाची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोरांबाबत कठोर भूमिका घेण्याबाबतचा इशारा दिला होता. घुसखोरी रोखण्यासाठी त्यांनी देशात 'हाय पॉवर डेमोग्राफी मिशन'सुरू केले जाणार असल्याची घोषणाही केली होती. आता या मिशनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील घुसखोरांना रोखण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या एका कार्यक्रमात देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर, आता अनेक वर्षांपासून सुरू असलेली घुसखोरी थांबवण्यावर लक्ष केंद्रित करण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

देशात होत असलेल्या बेकायदेशीर घुसखोरीविरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. लवकरच गृहमंत्रालयात घुसखोरी प्रभावित राज्ये असलेल्या त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगाल येथील मुख्यमंत्री आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार आता देशातील भाजपशासित पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांबाबत कठोर धोरण राबवण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात घोषणा केलेल्या 'हाय-पॉवर डेमोग्राफिक मिशन'अॅक्टिव्ह केल्याचं दिसून येत आहे.

त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सीमावर्ती भागातील घुसखोरी आणि अवैध स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या 'लोकसंख्याशास्त्रीय असंतुलना'मुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकला होता. आता अमित शाह यांनी मोदींनी संकेत दिलेल्या'हाय-पॉवर डेमोग्राफिक मिशन'च्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.

अमित शाह म्हणाले,"आता त्रिपुरा,आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अशी सरकारे आहेत,जी धोरणात्मकदृष्ट्या देशात कोणतीही घुसखोरी होऊ नये यावर विश्वास ठेवतात. आता लवकरच आम्ही गृह मंत्रालयात या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून घुसखोरी रोखण्यासाठी एक मजबूत सुरक्षा कवच तयार करणार असल्याचे स्पष्ट इशारा शाह यांनी दिला आहे.

केंद्र सरकारकडून लवकरच घुसखोरीचा मोठा फटका सहन कराव्या लागणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये कठोर कारवाई करण्याची आदेश बीएसएफला दिले जाणार असल्याचं समोर येत आहे. अमित शाहांनी स्वत: बीएसएफला सूचना देत घुसखोरांची ओळख पटवणे आणि त्यांना हद्दपार करण्याचं मिशनचा प्लॅन आखण्यास सांगितले आहे.

नक्षलवादानंतर आता देशाला घुसखोरमुक्त करण्याच्या दिशेनं आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी बीएसएफच्या कार्यक्रमात सरकार त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हाय-पॉवर डेमोग्राफी मिशन सुरू करत असल्याचं जाहीर केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या मिशनला मंजुरी मिळाली असूनन बीएसएफच्या जवानांना लवकरच घुसखोरीची संभाव्य ठिकाणे सोपवली जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT