Amit Shah_Student Protest 
देश

Amit Shah: विरोधकांनी संसद पाडली बंद! अखेर राम मंदिर अन् विद्यार्थी आंदोलनावर शहा संसदेत बोलणार पण...; किरेन रिजूजी यांचं विरोधकांना आवाहन

Amit Shah: देशात गेल्या महिनाभरात दोन अत्यंत महत्वाच्या घटना घडल्या. या घटना देशातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील होत्या, पण यावर अद्याप मोदी सरकारनं संसदेत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Amit Ujagare

Amit Shah: देशात गेल्या महिनाभरात दोन अत्यंत महत्वाच्या घटना घडल्या. या घटना देशातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भातील होत्या, पण यावर अद्याप मोदी सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळं सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावं अशी मागणी सातत्यानं काँग्रेससह इतर विरोधीपक्षांकडून केली जात आहे.

यासाठी अधिवेशनात विरोधकांनी अनेकदा गोंधळ घालत कामकाज बंद पाडलं होतं. राम मंदिरातील दानचोरी आणि दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर झालेली अमानुष पोलीस कारवाई यावर जोपर्यंत मंत्री बोलत नाहीत तोपर्यंत कामकामज होऊ दिलं जाणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतल्यामुळं अखेर अमित शहा याला उत्तर देतील असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी यांनी सांगितलं आहे. पण यासाठी त्यांनी एक अटही घातली आहे.

लोकसभेत बोलताना रिजिजू म्हणाले की, अमित शाह हे असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या नावानेच अतिरेकी आणि दहशतवाद्यांच्या अंगावर काटा येतो. या विधानानंतर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. त्यावर रिजिजू म्हणाले, "ज्या दिवशी इथं लोकसभेत चर्चा सुरू होईल आणि अमित शाह उत्तर देतील, तेव्हा ते तुम्हाला पचनी पडणार नाही. कार्यपद्धतीनुसार, ज्या मंत्र्याकडे संबंधित कामकाज असते, त्यांनाच सभागृहात यावे लागते. कोणता मंत्री सभागृहात येईल आणि कोण उत्तर देईल, हे तुम्ही ठरवू शकत नाही. याचा निर्णय सरकार आणि पीठासीन अधिकारी घेतात," असे संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितले.

सरकार विद्यार्थी आंदोलन आणि त्याच्या स्थितीबाबत सविस्तर आणि पूर्ण चर्चेसाठी तयार आहे. पण विरोधकांनी अमित शहांना उत्तर देत असताना त्यांना पूर्ण भाषण करुन द्यावं, मध्येच गोंधळ घालून त्यांच्या भाषणात अडथळा आणू नये, असंही रिजुजी यांनी म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांची आंदोलने आणि 'राम मंदिर दानचोरी'चा मुद्दा या दोन्ही विषयांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही मागण्या मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही, असं विरोधी पक्षांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी असा दावा केला होता की, राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निर्देश दिले होते की, त्यांनी सभागृहात येऊन विरोधकांच्या मागण्यांवर निवेदन द्यावं. मात्र, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT