chhatrapati sambhjinagar News : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी पार्किंगमध्ये आपल्या समर्थकांसोबत संवाद साधत होते. चर्चा करीत असताना दीपिके यांना अचानक त्रास जाणवू लागला. मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला, त्यांचा बीपी देखील लो झाला. त्रास जाणवत असल्याने ते कोणाशीही न बोलता तसेच घरात निघून गेले. त्यानंतर त्यांचे वडील भगवान दिपके यांनी घरीच डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर तातडीने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली.
तपासणी केल्यानंतर माध्यमाशी बोलताना डॉक्टर म्हणाले, 'सकाळी त्यांना दोन-तीन उलट्या झाल्या लूज मोशन पण झाले. त्यांचा थोडासा बीपी लो झाला होता. तपासणी केल्यानंतर त्यांना आयव्ही दिला आहे. पाच सहा वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांतरही तब्येत कव्हर झाली नाही तर रक्त तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टायफडबाबत दिल्लीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, नंतर त्याला निगेटिव्ह म्हणून दिले होते. तरी पण आपण एक रिपीट टेस्ट करण्याचा विचार करत आहोत. ऍडमिट करण्याची शक्यता कमी आहे, रिकव्हरी चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी अभिजीत दिपकेंच्या प्रकृतीबाबत दिली.
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणात सीजेपीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती, त्यासाठी जंतर मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन करण्यात आले, त्यानंतर संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनावेळी देखील अभिजित दिपके यांची तब्येत खालावली होती. यावेळी दिपके यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.