Kalavati Bandurkar News update Sarkarnama
देश

Kalavati Bandurkar On Amit Shah : कलावती बांदूरकर यांनी अमित शाहांना खोटं ठरवलं ! राहुल गांधींमुळे माझं आयुष्य बदललं..

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : "शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर यांना काँग्रेसने काहीही दिले नाही," असा दावा संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता. कलावती बांदूरकर यांनी अमित शाह यांचा दावा खोडून काढला आहे.

"भाजपनं मला काहीही दिले नाही, राहुल गांधींमुळे माझे आयुष्य बदलले," असे कलावती बांदूरकर म्हणाल्या. बांदूरकर यांच्या स्पष्टीकरणानंतर शाह यांच्या आरोपांमधली हवाच निघाली आहे. राहुल गांधी यांच्यामुळेच सर्व मदत मिळाल्याचे सांगत मोदी सरकारला कलावती बांदूरकर यांनी खोटं ठरवलं आहे.

"तिच्या वेदनांचे काँग्रेसने राजकारण केले..

संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत शाह यांनी "राहुल गांधी हे कलावती बांदूरकर यांच्या घरी गेले होते.पण हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कलावतीला मोदी सरकारने वीज, घर, शौचालय, धान्य आणि आरोग्य या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या," "तिच्या वेदनांचे काँग्रेसने राजकारण केले," असा आरोप शाह यांनी केला.

काय म्हणाले होते अमित शाह..

अविश्वास ठरावावर चर्चा करताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख करीत काँग्रेसची खिल्ली उडवली. कलावती यांचे नाव घेऊन शाह यांनी राहुल गांधींना "‘ओ कलावती का क्या करा?" असा सवाल केला होता. अधिवेशनात कलावती यांचा नावाचा उल्लेख झाल्यानंतर भाजपचे खासदारांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिल्या, अशी चर्चा यवतमाळमध्ये सुरू होती. त्यानंतर कलावतींनी याबाबत आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT