Raghunathdada Patil On Bachchu Kadu: आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले, ते राज्यमंत्रीच राहिले; त्यांनी त्यांची किंमत..

Maharashtra Politics : आमच्या दृष्टीने ते शून्य आहेत," अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली.
 Bachchu Kadu, Raghunathdada Patil
Bachchu Kadu, Raghunathdada Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News: 'मी मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही,'अशी आक्रमक भूमिका घेणारे शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांच्यावर बीआरएसचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी टीकास्त्र सोडलं. "बच्चू कडू यांनी अपेक्षाभंग केली," असा टोला त्यांनी लगावला. "त्यांना आम्ही उद्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करीत होतो. परंतु दुर्दैवाने ते मुख्यमंत्री पदाऐवजी राज्यमंत्री पदावर राहिले," अशा शब्दात रघुनाथदादांनी त्यांची खिल्ली उडवली.

सांगलीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. रघुनाथदादा पाटील यांनी नुकताच भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. त्यानंतर ते पहिल्यांदाच शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांच्‍या विविध मागण्‍यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्‍वात बुधवारी अमरावती येथे बुधवारी मोर्चा काढला. यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

 Bachchu Kadu, Raghunathdada Patil
Pakistan National Assembly News: पाकिस्तानची संसद बरखास्त, राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; निवडणुकीचा मार्ग मोकळा..

"बच्चू कडू यांना आम्ही चांगला आमदार समजत होतो. ते अपक्ष निवडून आले आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय कडू यांचे ते भाऊ आहे. पण आता त्यांनी कितीही मोर्चे काढले तरी शेतकऱ्यांमध्ये त्यांची किंमत राहणार नाही. त्यांनी आपली किंमत घालवली आहे. आमच्या दृष्टीने ते शून्य आहेत," अशी सडेतोड टीका बीआरएसचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

 Bachchu Kadu, Raghunathdada Patil
Mira Bhayandar Commissioner: मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय 'मीरा भाईंदर'चे आयुक्त ढोलेंची तडकाफडकी बदली ; काटकर नवे आयुक्त

ऊस दरासाठी भारत राष्ट्र समिती राज्यभर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. १५ ऑगस्ट नंतर पंढरपूर येथे आणि 3 सप्टेंबर रोजी संभाजी नगर येथे मांजरा खोऱ्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी जयंतीपासून पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी, आणि गुजरात प्रमाणे ऊसाला 5 हजार रुपये दर मिळावा, यासाठी बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा रघुनाथदादा पाटील यांनी केली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com