Amit Shah  sarkarnama
देश

Bihar Politics : 'पलटुराम' म्हणत अमित शाहांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

Amit Shah News : केंद्रीय मंत्री अमित शाह यांची नितीश कुमारांवर टीका

Amol Jaybhaye

Muzaffarpur News : 'पलटुराम'ने पाट्या फिरवून जनादेश मोडला. पलटूराम यांनी पंतप्रधान होण्याच्या जनादेशाचा विश्वासघात केला. येणाऱ्या काळात जंगल राजपासून आणि पलटू रामापासून बिहारला मुक्त करणार असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप (BJP) नेते अमित शाह हे रविवारी (५ नोव्हेंबर) बिहारमधील मुझफ्फरपूर बोलत होते. या वेळी अमित शाह म्हणाले, बिहारच्या जनतेला छठपूजेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. येत्या काळात बिहार जंगलराज आणि पलटूरामपासून मुक्त व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. तसेच बिहारच्या जनतेने 2024 मध्ये भाजपला 40 जागांवर विजय मिळवून द्यावा, असेही शाह म्हणाले.

अमित शाह (Amit Shah) म्हणाले, नितीश यांना 'इंडिया' आघाडीचे समन्वयक बनवले गेले नाही. त्यामुळे त्यांना आता त्यातून निघायचे आहे, पण त्यांना मार्ग सापडत नाही, असा टोला लगावला. लालू यादव यांच्या जंगलराजपासून वाचण्यासाठी तुम्ही भाजपला मत दिले होते. आरजेडी आणि जेडियू कलम 370 हटवण्याच्या बाजूने नव्हते, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या 9 वर्षांत देशातून दहशतवाद संपवण्यासाठी काम केले आहे. हे मी पल्टू बाबूंना सांगण्यासाठी आलो आहे. आरजेडी आणि जेडीयू जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या बाजूने नाहीत. कलम 370 हटवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील असे त्यांनी म्हटले होते. 'इंडिया' आघाडीचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे मोदींना विरोध करणे. भ्रष्टाचाराला विरोध करणारे नितीश कुमार आज याच लोकांसोबत बसून सत्ता उपभोगत आहेत.

हे लोक कौटुंबिक दुकान चालवत आहेत. एकाला पंतप्रधान व्हायचे आहे, तर दुसऱ्याला आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. नितीश कुमार यांना या महाआघाडीतून बाहेर पडायचे आहे, मात्र त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही. बिहारमध्ये केलेल्या जात सर्वेक्षणाबाबत शाह म्हणाले, भाजपसोबत जेडीयू सरकार चालवत असताना जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वेक्षणात यादव-मुस्लिम लोकसंख्येचा अतिरेक करण्यात आला आहे, तर लालू-नितीश जोडीने अत्यंत मागासलेल्या आणि मागासलेल्या वर्गावर अन्याय केला आहे, असा आरोप त्यांनी केला.

अमित शाह म्हणाले, केंद्र सरकारमधील 27 मंत्री ओबीसी समाजातील आहेत. 35 टक्क्यांहून अधिक ओबीसी आयोगाला घटनात्मक मान्यता देण्यात आली आहे. मला लालूजींना विचारायचे आहे की, तुम्ही 10 वर्षे यूपीए सरकारमध्ये राहिलात तर ओबीसी आयोगाला मान्यता का दिली नाही ? शिक्षणापासून नोकऱ्यांपर्यंत सर्वच क्षेत्रात ओबीसींना आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT