Dhananjay Munde News : अखेर पालकमंत्री मुंडेंकडून जाळपोळीच्या नुकसानीची पाहणी; सरकारनामा बातमीचा परिणाम !

Dhananjay Munde On Beed violence : ‘सरकारनामा’ने ‘मराठा आंदोलनात बीड एवढं जळालं ; पण पालकमंत्री धनंजय मुंडेंना पाहायला वेळ नाही?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde News Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यात गेल्या शनिवारपासून हिंसक घटना घडत आहेत. गेल्या सोमवारी तर दिवसभर बीड, माजलगाव व आष्टीत नेत्यांची कार्यालये, घरे, वाहनांची जाळपोळ व दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. जाळपोळ व दगडफेकीत बीड शहरात झालेल्या नुकसानीची रविवारी (ता. पाच) पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. याबाबत शनिवारी (ता. चार) ‘सरकारनामा’ने ‘मराठा आंदोलनात बीड एवढं जळालं ; पण पालकमंत्री धनंजय मुंडेंना पाहायला वेळ नाही?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे शहरात दाखल झाले. (Latest Marathi News)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे ता. 25 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केल्यानंतर जिल्ह्यातदेखील त्यांच्या समर्थनार्थ सर्कलनिहाय साखळी उपोषणे, कँडल मार्च, धरणे, रस्ता रोको अशी आंदोलने झाली.

Dhananjay Munde News
Dhananjay Munde News : मराठा आंदोलनात बीड एवढं जळालं ; पण पालकमंत्री धनंजय मुंडेंना पाहायला वेळ नाही ?

दरम्यान, गेल्या शनिवारी बीडमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली, तर दुसऱ्या दिवशी दोन बस फोडल्या. रविवार - सोमवारच्या मध्यरात्री आष्टीत तहसीलदारांचे शासकीय वाहन जाळण्यात आले, तर सोमवारी माजलगावात आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, घरातल्या वास्तू व काचांची तोडफोड करण्यात आली. याचे लोन दुपारनंतर बीड शहरातदेखील आले. राष्ट्रवादी भवन, क्षीरसागर यांच्या बंगल्याची जाळपोळ, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग, आमदार सोळंके यांचे भाऊ धैर्यशील सोळंके यांचे घर, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय तसेच काही हॉटेल्स व एका ज्वेलर्ससह भाजप, शिवसेना कार्यालयांवर दगडफेक करून मोठे नुकसान करण्यात आले.

जिल्ह्यात संचारबंदीदेखील लावावी लागली. गृह विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून होते. हिंसक घटना व जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचे तब्बल 66 गुन्हे नोंद झाले आहेत. हिंसक घटनांमध्ये 307 सारखे गंभीर कलम लावले आहेत. दीडशेच्या आसपास संशयित पोलिसांनी पकडले आहेत. 11 कोटी रुपये नुकसानीचा अहवाल दिला आहे. घटनेला सहा दिवस लोटूनही पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात पाहणीला आले नव्हते. त्यामुळे ‘सरकारनामा’ने शनिवारी ‘मराठा आंदोलनात बीड एवढं जळालं ; पण पालकमंत्री धनंजय मुंडेंना पाहायला वेळ नाही?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले हाेते.

Dhananjay Munde News
Maratha Aandolan Beed : जाळपोळ, दगडफेकीत बीड जिल्ह्यात 20 कोटींवर नुकसान ; सोळंके-क्षीरसागरांचे सर्वाधिक...

अखेर रविवारी धनंजय मुंडे प्रशासनातील अधिकाऱ्यांसह शहरात दाखल झाले. त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांचे कार्यालय, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय व घर, सोळंके यांचे घर, हॉटेल आदी ठिकाणी पाहणी केली. पंडित यांच्या शिवछत्र बंगल्याचीही त्यांनी पाहणी केली. या वेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोलिस निरीक्षक केतन राठोड आदींसह बळीराम गवते, अविनाश नाईकवाडे, नंदकुमार कुटे आदी सोबत होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com