Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah Video : युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे 'ते' भाषण व्हायरल...

Operation Sindoor update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत.

Rajanand More

Ceasefire Decisions and Their Outcomes : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता थांबला आहे. दोन्ही देशांमध्ये युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर तणाव निवळू लागला आहे. पण यावरून आता काही विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केले आहे. सोशल मीडियातही यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संसदेतील एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकने पलटवार करताना भारतावर ड्रोन व क्षेपणास्त्र डाकली. पण भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन, क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने हवेतच नेस्तनाबूत केली. दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहचल्यानंतर शनिवारी अचानक युध्दविरामाची घोषणा झाली.

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची चांगली संधी भारताकडे होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. अमेरिकेपुढे भारत झुकल्याची पोस्टही अनेकांनी केली. तर काहींनी अमित शहांचा दोन वर्षांपूर्वीचा संसदेतील भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

शहांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ता. 6 डिसेंबर 2023 रोजीचा हा व्हिडीओ आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यानचे शहांचे भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी बोलताना शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दोन चुकांकडे लक्ष वेधले होते.

काय म्हणाले होते शाह?

1948 मध्ये पाकिस्तानशी युध्दविरामासाठी सहमती दर्शविणे आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रापर्यंत नेणे, या नेहरूंच्या ऐतिहासिक चुका होत्या, असे शाह म्हणाले होते. 1948 मध्ये सैन्य जिंकत होते. युध्दविराम तीन दिवसांनी पुढे ढकलला असता तर पीओके (पाकव्याप्त काश्मीर) भारतात असते, असेही शाह म्हणाले होते. शनिवारी झालेल्या युध्दविरामानंतर शहांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT