Vijaya Rahatkar News : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हिरो अन् शस्त्रसंधीनंतर... परराष्ट्र सचिव ट्रोल; विजया रहाटकर संतापल्या...

India-Pakistan Ceasefire Agreement : सीझफायरचा निर्णय झाल्यानंतरही विक्रम मिश्री यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत शनिवारी भारताच्या वतीने त्याची घोषणा केली.
Vijaya Rahatkar, Vikram Misri
Vijaya Rahatkar, Vikram MisriSarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor update : भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा निर्णयाची घोषणा झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांना सोशल मीडियात ट्रोल केले जात आहे. त्यांचे कुटुंब, मुलीविरोधात ट्रोलिंग होत असल्याने वाद निर्माण झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर कडक शब्दांत भाष्य केले असून आता राष्ट्रीय महिला आयोगानेही त्याची दखल घेतली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले. त्यानंतर विक्रम मिश्री यांच्यासह सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह या भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील हल्ले-प्रतिहल्ल्यांची माहितीही त्यांनी इतर दिवशीही पत्रकार परिषदा घेऊन दिली. त्यामुळे देशभर या तिघांची चर्चा सुरू होती. देशाने त्यांना डोक्यावर घेतले.

Vijaya Rahatkar, Vikram Misri
Manoj Naravane: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या हल्ल्यानंतर 'अभी पिक्चर बाकी है' म्हणणारे मनोज नरवणे आता काय म्हणाले?

दोन्ही देशांमध्ये सीझफायरचा निर्णय झाल्यानंतरही मिश्री यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत शनिवारी भारताच्या वतीने त्याची घोषणा केली. मात्र, सोशल मीडियात अनेकांना हे आवडले नाही. त्यानंतर मिश्री यांना ट्रोल करण्यास सुरूवात झाले. त्यांना अत्यंत वाईट पध्दतीने ट्रोल करण्यास सुरूवात झाली. त्यांच्यासह कुटुंबाचे फोटोही सोशल मीडियात टाकण्यात आले. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्यामुळे मिश्री यांनी आपले एक्स अकाऊंट प्रायव्हेट केले.

काँग्रेससह इतर पक्षातीन नेत्यांनीही मिश्री यांची बाजू घेत त्यांचे कौतुक केले. आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियात पोस्ट करत त्यांनी महिला आयोग या ट्रोलिंगची कडक शब्दांत निषेध करत असल्याचे म्हटले आहे. विक्रम मिश्री यांचे कुटुंब, विशेषत: त्यांच्या मुली करण्यात आलेली ऑनलाईन बदनामी निंदनीय आहे, असे रहाटकर म्हणाल्या आहेत.

Vijaya Rahatkar, Vikram Misri
Justice Yashwant Varma: न्यायाधीश वर्मा यांच्या बंगल्यात सापडलेल्या नोटा गायब? सरन्यायाधीशांकडून पंतप्रधान, राष्ट्रपतींना अहवाल

परराष्ट्र सचिवांच्या मुलीची वैयक्तिक संपर्काची माहिती सार्वजनिक करणे गंभीर आहे. गोपनीयतेचे हे उल्लंघन आहे. हे त्यांची सुरक्षा धोक्यात आणू शकते. मिश्री यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर केले जाणारे असे वैयक्तिक हल्ले खपवून घेण्यासारखे नसून ते नैतिकदृष्ट्याही अक्षम्य आहेत, असा सूचक इशाराही रहाटकर यांनी दिला आहे. आम्ही सर्वांना सभ्यता आणि संयमाने वागण्याचा आग्रह करत आहोत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com