Amit Shah  Sarkarnama
देश

BJP News : चुकीला माफी नाही, अदानी प्रकरणावर अमित शाह पहिल्यांदाच म्हणाले...

Amit Shah on Adani: तपास यंत्रणांवर संशय असेल तर त्यांनी न्यायालयात धाव घ्यायला पाहिजे

सरकारनामा ब्युरो

Amit Shah on Adani: राष्ट्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करुन भाजप विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे, या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्प्ष्टीकरण दिले आहे. उद्योगपती गौतम अदानी विषयावर त्यांनी मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. एका कार्यक्रमात शाह बोलत होते.

विरोधक भाजपवर करीत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. विरोधकांना जर तपास यंत्रणांवर संशय असेल तर त्यांनी न्यायालयात धाव घ्यायला पाहिजे, ईडी, सीबीआय या संस्था निष्पक्षपातीपणे काम करीत असल्याचे शाह म्हणाले.

अदानी समुह प्रकरणावरील चौकशीविषयी अमित शाह म्हणाले, "अदानी प्रकरणी दोन सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या समितीची स्थापना केली आहे. ज्याच्याजवळ अदानी यांच्याविरोधात पुरावे आहेत, त्यांनी ते या समितीकडे दिले पाहिजे. जर कोणी चुक करीत असेल तर त्याला माफ केले जाणार नाही, कायदा सर्वांसाठी समान आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे. लोकांनी बिनबुडाचे आरोप करु नयेत, कारण असे आरोप फार काळ टीकत नाहीत,"

अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस दहा वर्षांच्या सत्तेत १२ लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला. तेव्हा सीबीआयकडे याची चौकशी सुरु होती. आता मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करीत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना या तपास यंत्रणा निशाना बनवितात, असा आरोप मोदी सरकारवर होत आहे, पण काँग्रेसकडे आमच्यापेक्षाही मोठे वकील आहेत, त्यांच्या माध्यमातून ते न्यायालयात दाद मागू शकतात," असे शाह म्हणाले.

न्यायालयापेक्षा या तपास यंत्रणा मोठ्या नाहीत, या तपास यंत्रणांनी पाठवलेल्या नोटिस, आरोपपत्र यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. न्यायालयात जाण्यापेक्षा विरोधक हे बाहेर टीका करीत असतात. दोन खटले सोडले तर सर्व खटले हे युपीए सरकारच्या काळातील आहेत. त्यांचे सरकार असतानाच हे गुन्हे दाखल झाले आहेत. भाजप त्यांची चौकशी करीत आहे, असे शाह म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT