Amit Shah on Wayanad Landslide Sarkarnama
देश

Amit Shah on Wayanad Landslide : 'सात दिवसांपूर्वीच दिला होता इशारा, केरळ सरकारने..' ; अमित शहांचं मोठं विधान!

Mayur Ratnaparkhe

Amit Shah Rajya Sabha Speech News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी संसदेत म्हटले की, केरळ भूस्खलानाच्या विनाशकारी घटनेच्या सात दिवस आधीच राज्य सरकारला पूर्व इशारा दिला गेला होता आणि 23 जुलै रोजी एनडीआरएफच्या नऊ टीम देखील रवाना करण्यात आल्या होत्या. परंतु राज्य सरकार या टीम पाहून जरी अलर्ट झाली असती, तर खूप काही वाचू शकलं असतं.

राज्यसभेत केरळच्या वायनाड जिल्ह्यात विनाशकारी भूस्खलानमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत लक्ष केंद्रित करण्याच्या प्रस्तावावर विविध पक्षाच्या सदस्यांकडून मागण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर बोलताना गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी हे विधान केलं.

इशाऱ्याकडे केले गेले दुर्लक्ष -

अमित शाह यांनी वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात जीव गमावणाऱ्यांबाबत शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले की चर्चेत अनेक सदस्यांनी पूर्वसूचना प्रणालीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले की ते या सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला हे सांगू इच्छित आहेत की, 23 जुलै रोजी केरळ सरकारला भारत सरकारकडून पूर्व इशारा दिला गेला होता.

त्यांनी सांगितले सात दिवस आधी हा इशारा देण्यात आल्यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी पुन्हा इशारा दिला गेला आणि 26 जुलै रोजी म्हटले गेले की, 20 से.मी पेक्षा अधिक तथा अतिवृष्टी होईल, भूस्खलाची शक्यता आहे, गाळही खाली वाहीन येवू शकतो आणि लोक याखाली दबून मृत्यूमुखी पडू शकतात.

अमित शाह म्हणाले, या गोष्टी ते सभागृहात सांगू इच्छित नव्हते परंतु जेव्हा काही सदस्यांनी म्हटले, कृपया आमचे म्हणणे ऐका. तर आमचं(सरकारचं) म्हणणं आहे की, कृपया ज्या सूचना केल्या आहेत, त्या जरा वाचाव्यात.

त्यांनी म्हटले की, या देशात काही राज्य सरकारं अशी आहेत, ज्यांनी आधी देण्यात आलेल्या अशा प्रकारच्या सूचनांवर गांभीर्याने लक्ष देवून काम केलं आणि अशाप्रकारच्या आपत्तीमुळे होणारी हानी टाळली. अमित शाह यांनी ओडिशामध्ये यापूर्वीच्या नवीन पटनायक(Naveen Patnaik) सरकारला चक्रीवादळाबाबत सात दिवस आधी देण्यात आलेल्या इशाऱ्याचे उदाहरण दिले आणि सांगितले की या चक्रीवादळात केवळ एका व्यक्तीचा जीव गेला, तोही चुकून. तसेच, गुजरातला अशा प्रकराच्या चक्रीवादळाबाबत तीन दिवस आधी इशारा दिला गेला होता आणि तिथे एका जनावराचाही जीव गेला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT