Kangana Ranaut On Rahul Gandhi: खासदार कंगनाची मोठी मागणी; म्हणाली, '...म्हणून राहुल गांधींची ड्रग्ज टेस्ट करा!'

BJP Vs Congress News : राजकीय क्षेत्रात येण्याआधीपासूनच कंगनाने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली होती. तसेच तिला मोदींची कट्टर समर्थक समजले जाते. तिने मोदींवर हल्लाबोल करणार्या नेत्यांवर समाचार घेतल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे.
Kangana Ranaut and Rahul Gandhi
Kangana Ranaut and Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Kangana Ranaut News : लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगल्या निवडून आल्यानंतर विरोधकांचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढला आहे.त्यामुळे संसदेतही मोदी सरकारवर विरोधात इंडिया आघाडीचा आवाज वाढला असून सभागृह दणाणून सोडले जात आहे.

याचाच भाग म्हणून लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी मोदी सरकारवर अक्षरश: तुटून पडले होते.या टीकेनंतर भाजपनेही जशास तसा पलटवार करत त्यांचे दावे खोडून काढले होते.आता खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) देखील राहुल गांधींवर टीकेची तोफ डागली आहे.

बॉलिवूड गाजवल्यानंतर कंगना रनौतने भाजपकडून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही.आधीच आपल्या रोखठोक विधानं आणि आक्रमक शैलीमुळे चर्चेत राहणारी कंगना आता राहुल गांधींवर भडकली आहे.तिने आता थेट राहुल गांधींवर (Rahul Gandhi) आरोप करतानाच ते ड्रग्ज घेत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांची ड्रग्ज टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

कंगना नेमकं काय म्हणाली..?

कंगना रनौत म्हणाली, संसदेत ते ज्याप्रकारे उद्धटपणे बोलतात, ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी शंकराची वरात अन् चक्रव्यूह असल्याचं वक्तव्य केलं, ज्यामुळे त्यांची चाचणी व्हायला हवी. कदाचित ते तेव्हा मद्य किंवा ड्रग्जच्या नशेत असतील, असा आरोप कंगनाने केला आहे.त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Kangana Ranaut and Rahul Gandhi
Uddhav Thackeray News : तुमच्या नाकावर टिच्चून सत्ता आणून दाखवतो; उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना चॅलेंज
Summary

राहुल गांधी यांची ड्रग्ज टेस्ट व्हायला हवी.त्यांच्या भाषणातून ते कायमच संविधानाला ठेच पोहचवत असतात.कालही त्यांनी संसदेत चक्रव्यूह आणि ही भगवान शंकाराची वरात आहे, असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांची ही टेस्ट केली पाहिजे. त्यांचं भाषण हे संसदेत कॉमेडी शो असल्याची खोचक टीकाही कंगना यावेळी केली.

तिने यावेळी आपल्या देशात पंतप्रधानांची निवड करताना लिंग, वय, जात आणि वर्ग लक्षात घेऊन केली जाते का? असा संतप्त सवालही कंगनाने काँग्रेसच्या राहुल गांधींना यांना केला आहे. आता कंगनाच्या टीकेला काँग्रेस कसं प्रत्युत्तर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Kangana Ranaut and Rahul Gandhi
Amol Mitkari : संदीप देशपांडे पळपुटे, त्यांच्यात मस्ती किती बघतो; मिटकरींनी थोपटले दंड

राजकीय क्षेत्रात येण्याआधीपासूनच तिने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली होती. तसेच तिला मोदींची कट्टर समर्थक समजले जाते. तिने मोदींवर हल्लाबोल करणार्या नेत्यांवर समाचार घेतल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे.

एकीकडे मोदींवर कौतुकाचा वर्षाव करतानाच दुसरीकडे ती राहुल गांधी,उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.आता खासदार झाल्यानंतर कंगनाच्या टीकेची धार आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

Kangana Ranaut and Rahul Gandhi
Amol Mitkari : अमोल मिटकरी 'हिशेब चुकता करणार'; म्हणाले, मनसेच्या पाठीवर लाथा हाणून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com