Amit Shah News Sarkarnama
देश

Amit Shah Lok Sabha Speech : अमित शाह काँग्रेसच्या खासदाराला म्हणाले, आमच्या वेळेतील अर्धातास घ्या... संसदेत नेमके काय घडले ?

Amit Shah News : गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha News : लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. या अविश्वास प्रस्तावामुळे देशातील विरोधकांचे खरे चरित्र दिसून येईल, असे अमित शाह म्हणाले. आपले सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करणे हे यूपीएचे चारित्र्य असल्याचे सांगत शाह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मात्र, अमित शाह संसदेत बोलत असताना काँग्रेसचे (Congress) नेते अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यावर शाह यांनी चौधरी यांना टोला लगवाला.

चौधरी यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. त्यावर शाह यांनी चौधरी यांना चिमटा काढला, तुम्ही माझ्या मध्ये बोलू नका. तुमचा पक्ष तुम्हाला बोलू देत नाही. त्याला आम्ही काही करू शकत नाही. मी संसदीय कामकाज मंत्री आक्षेप घेणार नाहीत. मी अध्यक्षांना विनंती करतो की आमच्या पक्षाच्या वेळेतील अर्धातास यांना द्या. त्यावेळेत बोला आता खाली बसा. माझ्या भाषणाच्या मध्ये बोलू नका, असे शाह म्हणाले. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना शाह म्हणाले, मोदी सरकारने परिवारवाद आणि तुष्टीकरण हटवून विकासाला प्राधान्य दिले. तुमच्यावर ना जनतेचा अविश्वास आहे ना सभागृहाचा. पंतप्रधान २४ तासांत १७ तास काम करतात. आम्ही सलग दोनदा दोन तृतीयांश बहुमताने विजयी झालो आहोत. यूपीएच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे सांगत होते. आमचा फक्त कर्ज माफ करण्यावर विश्वास नाही. तर अशी व्यवस्था निर्माण करण्यावर विश्वास आहे की जिथे कुणालाही कर्ज घ्यावे लागणार नाही.

आम्ही शेतकऱ्यांना जे काही दिले ते फुकट नाही, तर त्यांना स्वावलंबी बनवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला. यूपीएचे चारित्र्य सत्तेचे रक्षण करणे आहे, परंतु एनडीए तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी लढतो. जम्मू आणि काश्मीर बाबत आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत 'कलम ३७० रद्द' केले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT