Vidarbha Activists Morcha: फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा; काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Devendra Fadnavis News: अन्न धान्यावरील 'जीएसटी'सह विविध मागण्यासाठी विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झाले
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Morcha News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर मोर्चा काढण्यात आला असून ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अन्न धान्यावरील 'जीएसटी'सह विविध मागण्यासंदर्भात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत.

फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच काही आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar News: विजय वडेट्टीवारांवर नागपूर, रामटेकची जबाबदारी; काँग्रेसला बळ मिळणार?

वेगळ्या विदर्भ राज्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. याबरोबरच विजदरात घट द्यावी, तसेच अन्न धान्यावरील जीएसटीच्या विरोधात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सुरवातीला 'लाँग मार्च' काढला. मात्र, नंतर फडणवीसांच्या नागपूर येथील निवासस्थानाकडे आंदोलकांनी कूच केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीवेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

Devendra Fadnavis
BRS In Maharashtra Politics: राष्ट्रवादीमुळे 'बीआरएस'ची महाराष्ट्रातील वाटचाल मंदावली?

यानंतर पोलिसांनी फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स लावत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पण तरीही आंदोलकांनी फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com