Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah News : भाजपला बहुमत मिळालं नाही तर काय असणार 'प्लॅन बी'; अमित शाह म्हणाले...

Political News : पाचव्या टप्प्यासाठी देशभरात 20 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक मुलाखत दिली. त्यामध्ये मोठे विधान केले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : चार टप्प्यातील मतदान झाले असल्याने लोकसभा निवडणूक आता रंगतदार स्थितीत आहे. चौथ्या टप्प्यापर्यंत देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 380 म्हणजे जवळपास 70 टक्के मतदार संघातील मतदान पार पडले आहे. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये केवळ 163 मतदारसंघ शिल्लक राहणारा आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पाचव्या टप्प्यासाठी देशभरात 20 मे रोजी मतदान होणार असल्याने उद्या प्रचार तोफा थंड होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) रणसंग्राम आता शिगेला पोहोचला असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये मोठे विधान केले आहे. (Amit Shah News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक मुलाखतप्रसंगी भाजपला (Bjp) जर येत्या लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? भाजपाला 272 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर पुढील रणनीती काय असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी भाजपाला किती जागा मिळू शकतात? हेच सविस्तर सांगितले.

या निवडणुकीत भाजपला 272 पेक्षा कमी जागा मिळतील, असे वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या योजनांचा लाभ मिळालेला 60 कोटींचा जनाधार आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्हाला प्लॅन बी ची गरजच नाही, कारण आमचा प्लॅ ए यशस्वी होणार असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील असा दावा करताना अमित शाह म्हणाले, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजप हाच सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. दक्षिणेतील राज्यात भाजपा हा एकमेव मोठा पक्ष म्हणून समोर येईल. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत बहुमत मिळणार आहे.

राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी 400 जागा आवश्यक

भाजपकडे याआधीच्या दोन टर्ममध्ये बहुमत होते. त्यामुळे तिसऱ्यांदा बहुमत मिळण्याची शक्यता अधिक आहे. देशात राजकीय स्थिरता आणण्यासाठी एनडीएला 400 हून अधिक जागा हव्या आहेत. भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविणे आणि सामान्य नागरिकांचे कल्याण करण्यासाठी 400 हून अधिक जागा भाजपला हव्या आहेत, असेही यावेळी अमित शाह यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT