Amit Shah : अमित शाह पंतप्रधान होणार? केजरीवालांच्या दाव्याला शाहांचेच उत्तर

Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 75 वर्षांवरील नेत्यांना मार्गदर्शक मंडळात नेमले होते. त्यामुळे मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी यांचे राजकारण संपल्याची टीका करण्यात येत होती.
arendra Modi Amit Shah Arvind Kejriwal
arendra Modi Amit Shah Arvind Kejriwalsarkarnama
Published on
Updated on

Political News : तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा दावा केला होता. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पंतप्रधानाचा कोण दावेदार आहे. मोदींनंतर अमित शाह पंतप्रधान होतील,असे केजरीवाल Arvind Kejriwal म्हणाले होते. केजरीवलांच्या या दाव्याला अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

arendra Modi Amit Shah Arvind Kejriwal
Arvind Kejrival News : तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचं मोठं भाकीत; मोदींनंतरचा पंतप्रधानच सांगून टाकला

अमित शाह Amit Shah म्हणाले, अरविंद केजरीवाल आणि कंपनीला तसेच इंडी आघाडीला सांगू इच्छितो की मोदीजी 75 वर्षांचे होणार आहेत म्हणून आनंदित होण्याची आवश्यकता नाही. भाजपच्या संविधानात असे कोठेही लिहिलेले नाही. भाजपमध्ये कुठलेही कन्फ्यूजन नाही. मोदीजी Narendra Modi ही टर्म पूर्ण करतील आणि पुढे देखील देशाचे नेतृत्व करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 75 वर्षांवरील नेत्यांना मार्गदर्शक मंडळात नेमले होते. त्यामुळे मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी यांचे राजकारण संपल्याची टीका करण्यात येत होती. याच वरून अरविंद केजरीवाल म्हणाले होती की मोदींना विरोधी नेत्यांसोबत भाजपमधील नेत्यांचे राजकारण संपवले आहे. वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान यांचे राजकारण मोदींनी संपवले

उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री बदलणार

अरविंद केजरीवाल म्हणाले की नरेंद्र मोदी जर लोकसभा निवडणूक जिंकले तर योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून हटवतील. तसेच विरोधीपक्षातील नेत्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टॅलिन यांना जेलमध्ये टाकतील.

arendra Modi Amit Shah Arvind Kejriwal
Supriya Sule News: तुमचं सरकार येणार नाही अन् तुम्हाला मतदानही...'; प्रतिभा पवार सुळेंना असं का म्हणाल्या होत्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com