Union Home Minister Amit Shah speaks in the Lok Sabha as Congress leader Rahul Gandhi listens during a heated parliamentary debate. Sarkarnama
देश

Amit Shah Vs Rahul Gandhi : समोर बसलेल्या राहुल गांधींवर शहांचे थेट वार; पण काँग्रेसच्या बड्या नेत्यानं हात वर करून का वाजविल्या टाळ्या?

lok sabha political debate india : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान त्यांनी सहभाग घेतला नाही. सरकारी विधेयकाच्या चर्चेत भाग घेतला नाही. केंद्रीय बजेटमध्ये चर्चेत सहभाग घेतला नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली.

Rajanand More

Amit Shah speech parliament : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव बुधवारी आवाजी मतदानाने नामंजूर करण्यात आला. जवळपास १३ तासांच्या चर्चेनंतर प्रस्तावावर आज मतदान झाले. सत्ताधाऱ्यांची बाजू वरचढ असल्याने मतदानाची केवळ औपचारिका होती. मात्र, त्याआधी प्रस्तावावरील अखेरच्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केले.

राहुल गांधी हेही शहा यांच्या भाषणाला उपस्थित होते. शहांनी सुमारे सव्वा तासांच्या भाषणात राहुल यांच्यावर निशाणा साधताना अनेक मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले, राहुल गांधी म्हणतात की, बोलण्याची संधी दिली जात नाही. पण जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा ते बोलत नाही. त्यावेळी ते जर्मनी, इंग्लंडला जातात आणि नंतर तक्रार करतात.

सभागृहात काँग्रेसला १५७ तास ५५ मिनिटे बोलण्याची संधी मिळाली. तुम्ही किती बोलले, कुणी रोखले असा थेट सवाल शहांनी राहुल गांधींना विचारला. विरोधी पक्षनेत्यांचा पक्ष लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणतो, त्यावरही विरोधी पक्षनेते बोलत नाहीत. ते बोलू इच्छित नाहीत. जेव्हा बोलतात, तेव्हा नियमानुसार बोलता येत नाही. ही कुठली सभा नाही, नियमानुसार बोलावे लागते. कुणी बोलायचे, हे ठरविण्याचा अधिक पक्षाच्या नेत्यांचा असतो, असे अमित शाह म्हणाले.

अध्यक्षांनी एकदा थांबविल्यानंतरही तुम्ही बोलायचे थांबणार नसाल तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. एसआयआरवर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर चर्चा करण्याची आयडिया त्यांनी दिली. त्यांच्या या महान प्रेस कॉन्फरन्सवर बोलण्यास परवानगी न देत ओम बिर्ला यांना सभागृहावर उपकार केले, असे अमित शाह यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या अधिकारांवर बोलतात. १७ व्या लोकसभेत त्यांच्या उपस्थिती ५१ टक्के होती. १६ व्या लोकसभेत त्यांची उपस्थिती ५२ टक्के होती. १५ व्या लोकसभेत ४३ टक्के उपस्थिती होती, असे अमित शाह म्हणताच विरोधकांनी त्यावरून गोंधळ घातला. अमित शाह हे अविश्वास प्रस्तावावर न बोलता केवळ विरोधी पक्षनेत्यावर बोलत आहेत, असे के. सी. वेणुगोपाल म्हणाले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान त्यांनी सहभाग घेतला नाही. सरकारी विधेयकाच्या चर्चेत भाग घेतला नाही. केंद्रीय बजेटमध्ये चर्चेत सहभाग घेतला नाही. आणि हे बोलू दिले जात नाही, असे सांगतात. अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेतही त्यांनी सहभाग घेतला नाही. त्यांना बोलायचेच नाही. अनेक महत्वाच्या विधेयकांवर बोलले नाहीत, याची यादी अमित शहांनी वाचून दाखविली.

राहुल गांधी हे काँग्रेसचेही मोठे नेते आहेत. पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना देशभरात जावे लागते. पण संसद सुरू असताना ते मागील काळात व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया आदी देशांत होते. बजेट किंवा महत्वाचे सत्र असते, तेव्हा त्यांचा परदेश दौरा असत, असा मुद्दा अमित शाह यांनी काढला.  

दरम्यान, अमित शाह यांनी भाषणादरम्यान उपाध्यक्षांच्या रिक्त जागेचा मुद्दाही काढला. काँग्रेसच्या काळात अध्यक्षांविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी लोकसभेचे उपाध्यक्ष हे काँग्रेसचेच होते. आम्ही तरी उपाध्यक्षांची जागा तुमच्यासाठी रिकामी ठेवली आहे, असे विधान अमित शहांनी केले. त्यावर राहुल गांधी यांच्या शेजारी बसलेले काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी उपरोधिकपणे हात वर करून टाळ्या वाजविल्या. मागील सात वर्षांपासून उपाध्यक्षांचे पद रिक्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT