Amit Shah, Rahul Gandhi (AI Image) Sarkarnama
देश

Amit Shah News: संयम संपला..! अमित शहांचा राहुल गांधींसह विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला मोठा इशारा, '2029 मध्ये त्यांनी मोठ्या पराभवाला...'

BJP VS Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: काँग्रेसप्रणित विरोधकांच्या इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला काही दिवसांपासून सळो की पळो करु सोडलं आहे.एकापाठोपाठ एक आंदोलनं,मोर्चे,पत्रकार परिषदा, छात्रों की गूंज यांसारख्या विविध माध्यमांतून राहुल गांधी अन् विरोधकांनी दिल्लीत सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी न सोडण्याचा पक्का इरादा केल्याचं दिसून येत आहे. मात्र,विरोधकांच्या आक्रमणापुढे मौन धारण केलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता राहुल गांधींसह विरोधकांना एसआयआरच्या मुद्द्यांवरुन डिवचलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी अमित शाह यांनी गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपचा दणदणीत विजयाचा संदर्भ देत काँग्रेससह विरोधकांनी आव्हान दिलं आहे.

अमित शाह यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. तसेच ईव्हीएम किंवा निवडणूक प्रक्रियेला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करण्याचा खोचक सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी एसआयआर प्रक्रियेला विरोध करतानाच राहुल गांधी हे प्रत्यक्षात घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

एसआयआर प्रक्रियेद्वारे मतदार यादीतून अवैध घुसखोरांची नावे वगळली जात असल्याचंही सांगितलं आहे. याचदरम्यान,त्यांनी राहुल गांधी यांना आव्हान देत, 2029 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह त्यांच्या इंडिया आघाडीतील पक्षांना सलग चौथ्यांदा मोठ्या पराभवाला सामोरे जाण्यासाठी तयार राहावं,अशी टीका केली.

अमित शाह म्हणाले, काँग्रेस गुजरातमध्ये 1985 नंतर एकही निवडणूक जिंकू शकलेली नाही, असा दावा अमित शाह यांनी केला. त्या काळातही SIR प्रक्रिया लागू होती का? राहुल गांधी काँग्रेसचे प्रमुख नेते झाल्यापासून पक्षाला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत असल्याचं सांगत निशाणा साधला.

शाह यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील अलीकडील पोटनिवडणुका तसेच राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाच्या 85 टक्क्यांहून अधिक प्रभागांमध्ये उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT