Pradeep Purnekar News: प्रदीप पूर्णेकर हत्याकांड: शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर आरोपांचे शिंतोडे, एकनाथ शिंदे दोन आठवड्यानंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

Thane Crime News: प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या मिनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या चौकशीची जोरदार मागणी करत मोठा मोर्चाही ठाण्यात काढण्यात आला
Pradeep Purnekar Eknath Shinde
Pradeep Purnekar Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांना बेसावध असताना क्रूरपद्धतीनं संपवण्यात आलं. त्यांच्या हत्येमुळे ठाणेच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरलं. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर पूर्णेकर कुटुंबीय तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची सूत्रेही त्याचदिशेनं फिरताना दिसून येत आहे. मात्र, या हत्येप्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांनंतर पहिल्यांदाच परखड भाष्य केलं आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी(ता.13 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीतील नाराजीनाट्य यांसह प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणीही कठोर भूमिका जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेवेळी शिंदेंना पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी सवाल करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले,"प्रदीप पूर्णेकर यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आहे.या हत्येप्रकरणातील दोषी आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी आपण ठाणे पोलीस आयुक्तांना निष्पक्ष चौकशीचे निर्देश दिल्याचं सांगितलं. या हत्ये प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे येत्या काळात प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी आरोपांचे शिंतोडे उडवलेल्या गेलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जाणार नाही. दोषींवरील कठोर कारवाईचा हा शब्द देत शिंदेंनी ठाण्यातील पूर्णेकर कुटुंबाला आधार देत एकप्रकारे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे.

एकीकडे एकनाथ शिंदेंचा पत्रकार परिषदेत दोषींवर कारवाईचा इशारा अन् दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी त्यांचं कुटुंब तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यापासून ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आलं होतं. ही हत्या शिंदे पती-पत्नीनेच घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांनी केल्याचा आरोप केला आहे.

Pradeep Purnekar Eknath Shinde
Thane Crime Branch: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: 'क्राईम ब्रँच'कडून तातडीचं बोलावणं, मिनाक्षी शिंदेंच्या पतीनं लगबगीनं गाठलं पोलिस स्टेशन

त्यांचीही चौकशीची जोरदार मागणी करत मोठा मोर्चाही ठाण्यात काढण्यात आला. यानंतर तपासानं वेग घेतला असून अचानक ठाणे क्राइम ब्रँचनं राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावून घेतलं. तसेच संतोष कनोजिया उर्फ टल्लीसह पाचही आरोपींना समोरासमोर बसवत त्यांची कसून चौकशी ठाणे क्राईम ब्रँचकडून सुरू करण्यात आली आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या मिनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या चौकशीची जोरदार मागणी करत मोठा मोर्चाही ठाण्यात काढण्यात आला. यानंतर तपासानं वेग घेतला असून अचानक ठाणे क्राइम ब्रँचनं राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावून घेतलं.

Pradeep Purnekar Eknath Shinde
Someshwar Election: 'सोमेश्वर'वर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व; सर्व 21 जागा जिंकल्या : पुरुषोत्तम जगतापांचे 13 वर्षांचे साम्राज्य संपुष्टात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com