Rakesh Tikait and Amit Shah Sarkarnama
देश

Rakesh Tikait : ''...आणि 2024 मध्ये अमित शाह पंतप्रधान असतील''; राकेश टिकैत यांची राजकीय भविष्यवाणी!

Mayur Ratnaparkhe

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी मेरठमध्ये मोठी राजकीय भविष्यवाणी केली आहे. ''2024मध्ये भाजपचं सरकार येईल आणि याचबरोबर नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील, कालांतराने ते पंतप्रधापद सोडून राष्ट्रपती होतील आणि मग अमित शाह(Amit Shah) हे पंतप्रधान असतील, तर योगी आदित्यनाथ केंद्रीय गृहमंत्री होतील.''

या वेळी राकेश टिकैत(Rakesh Tikait) यांनी म्हटले की, राजकीय पक्ष नाही तर देशाला राजकीय विचारधारा वाचवेल. तसेच टिकैत यांनी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली, सर्वांनी एक व्हावं अन्यथा मारले जाल. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर निशाणा साधत म्हटले की, हैदराबादी मोठं दुखणं आहे, 'बी' नाही आता 'सी' टीमदेखील आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या विरोधात सरधनाचे समाजवादी पार्टीचे आमदार अतुल प्रधान यांच्या बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशीही राकेश टिकैत यांनी हजेरी लावली होती. या वेळी टिकैत यांनी खासगी डॉक्टर्स आणि रुग्णालय व्यवस्थेवर जोरदार टीका केली. टिकैत म्हणाले, डॉक्टरांचा मोठा आदर आहे, परंतु तुमच्या व्यवसायाचा जास्त व्यापार करू नका. सन्मानाचा दुरुपयोग करू नका. अनेक रुग्णालयं कंत्राटावर सुरू आहेत.

याचबरोबर राकेश टिकैत असंही म्हणाले, रुग्वाहिकांवाले कमिशनसाठी रुग्णांना गल्लीबोळातील रुग्णालयांमध्ये घेऊन जातात. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये तर कान आणि खिसे कापले जात आहेत. या वेळी केएमसी रुग्णालयही त्यांच्या निशाण्यावर होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT