Rajasthan Politics : बाबा बालकनाथ यांच्या ट्विटने राजस्थानमध्ये नवा 'ट्विस्ट'; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ?

Rajasthan New CM : राजस्थानचा मुख्यमंत्री ठरण्यासाठी भाजपचे तीन निरीक्षक जयपूरला रवाना
Rajasthan Politics : बाबा बालकनाथ यांच्या  ट्विटने राजस्थानमध्ये नवा 'ट्विस्ट'; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ?
Published on
Updated on

Rajasthan News : महंत बालकनाथ यांच्याकडे राजस्थानचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून पाहिले जात आहे. राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावावर आज ( शनिवारी ) विचारमंथन होणार आहे. अशा परिस्थितीत बाबा बालकनाथ यांच्या या ट्विटवरून अनेक अर्थ काढले जात आहेत.

राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावर निर्णय घेण्यासाठी भाजपचे (bjp )तीन निरीक्षक शनिवारी ( ता. 9) दिल्लीहून जयपूरला येत आहेत. येथे ते नवनिर्वाचित आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर विचारमंथन करतील आणि त्यानंतर हा अहवाल पक्षप्रमुखांना सादर करतील. मात्र, या भेटीपूर्वी बाबा बालकनाथ यांनी एक ट्विट करून राजस्थानमधील राजकीय खळबळ वाढवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajasthan Politics : बाबा बालकनाथ यांच्या  ट्विटने राजस्थानमध्ये नवा 'ट्विस्ट'; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ?
Nagpur winter session : विधानसभेत पुण्याच्या आमदारांची 'अळीमिळी गुपचिळी

काय म्हणाले बाबा

बाबा बालकनाथ यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहिली आहे, 'पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांच्या नेतृत्वाखाली जनतेने पहिल्यांदाच खासदार आणि आमदार बनवून देशसेवेची संधी दिली. निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

तिजारा विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आल्यानंतर बाबा मस्तनाथ मठाचे महंत बालकनाथ योगी यांचा मुख्यमंत्री पदांसाठी दावा प्रबळ मानला जात आहे. बालकनाथ यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्याची दिल्लीत सक्रियता वाढली आहे. गुरुवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांची भेट घेतली, त्यानंतर चर्चाना उधाण आले होते. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Rajasthan Politics : बाबा बालकनाथ यांच्या  ट्विटने राजस्थानमध्ये नवा 'ट्विस्ट'; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर ?
Winter Session Nagpur: यासाठी थोरातांनी केले सावेंचे तोंड भरून कौतुक; फडणवीसही झाले अवाक्

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com