Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah: "...तरीही अमित शहा पंतप्रधान बनू शकणार नाहीत"; महाराष्ट्रातील खासदाराचा खळबळजनक दावा

Sanjay Raut on Amit Shah becoming Prime Minister: देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा पण आम्ही समान नागरी कायद्याच्या राजकारणाला विरोध करणार आहोत, असंही या खासदारानं म्हटलं आहे.

Amit Ujagare

Amit Shah Latest News: समान नागरीक कायदा (युसीसी) लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एका विधानावर महाराष्ट्रातील खासदारानं तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांनी म्हटलं की, त्यांचा अजेंडा आहे पण देशातील अनेक राज्यांमध्ये त्यांना हा कायदा लागू करण्यात अडचण येणार आहे. त्यामुळं काहीही केलं तरी अमित शहा पंतप्रधान बनू शकणार नाहीत, असा खळबळजनक दावाही यावेळी या खासदारानं केला आहे.

अमित शहांच्या समान नागरीक कायदा लागू करण्याबाबतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा लागू करु इच्छिता. पण देशात एक संविधान असायला हवं, देशात एकच कायदा असायला हवा. आम्ही सर्वजण हे मानतो की, देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा. पण जेव्हा तुम्ही समान नागरी कायद्याचं राजकारण करता तेव्हा आम्ही याचा विरोध करणार आहोत.

"त्यांचा हा अजेंडा आहे, पण गोव्यात काय होणार? ते गोव्यात समान नागरी कायदा लागू करु शकतील का? ईशान्य भारतात ते समान नागरी कायदा लागू करु शकतील का? पण ते असं करु शकणार नाहीत. कारण त्या राज्यांमध्ये कायदेशीर पेच आहे. निवडणुकांसाठी तुम्ही राजकारण करु नका, हे केल्यानंतरही अमित शहा हे काही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत" अशा शब्दांत अमित शहा यांना संजय राऊतांनी डिवचलं आहे.

अमित शहा यांनी काय म्हटलं होतं?

अमित शहा रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी २१ राज्यांतील भाजप-एनडीएची सरकारे २०२९ पूर्वी समान नागरिक कायदा लागू करतील. शहा यांनी म्हटलं होतं की, तीन तलाक संपवून मुस्लिम महिलांना समान अधिकार देण्यात आले आहेत. आम्ही अनेक राज्यांमध्ये समान नागरीक कायदा लागू केला आहे. तसंच मला विश्वास आहे की, भाजप-एनडीएशासित २१ राज्यांत २०२९ पूर्वी समान नागरी कायदा लागू करण्यात येईल. देशात २०२९ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे.

शहा पुढे असंही म्हणाले होते की, केंद्र सरकारनं भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून देशातील क्रिमिनल जस्टिस सिस्टिम मजबूत केली आहे. जर २०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी २१ भाजपशासित राज्यात उत्तराखंड आणि गोव्यात समान नागरी कायदा लागू आहे. यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार समान नागरी कायदा आणणार आहे. यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी म्हटलं की, व्यक्तीची ओळख ही त्याच्या धर्मावरुन नव्हे तर त्याच्या देशावरुन होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT