CM Jagan Mohan Reddy
CM Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगनमोहन सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेणार

सरकारनामा ब्युरो

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्याकडून सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा (Assembly Election) व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्याकडून संपूर्ण मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे बहुतेक मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. गुरूवारी सध्याच्या मंत्रिमंडळाच्या शेवटची बैठक होणार आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर गुरूवारी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची विजयवाडा येथे राज भवनात भेट घेतली. मंत्रिमंडळ (Cabinet) बदलाबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिल्याचे समजते. नवीन मंत्र्यांच्या नावांची अंतिम यादीही त्यांना आजच दिली जाण्याची शक्यता आहे. केवळ चार मंत्री वगळून इतर सर्व मंत्र्यांना बदलले जाणार असल्याची माहिती सरकारमधील सुत्रांनी दिली. आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 26 मंत्र्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रेड्डी यांनी गुरूवारी सध्याच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच मंत्र्याचे राजीनामेही याच बैठकीत घेतले जाण्याची शक्यता आहे. रेड्डी यांनी सत्तेत आल्यानंतर दोन ते अडीच वर्षांनी अर्ध्या मंत्रिमंडळात तरी बदल करून इतर आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्याचे आश्वासन रेड्डी यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी शब्द पाळल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या नेत्यांना पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी वापर केला जाणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदल केले जाणार आहे. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करून आमदारांना संधी दिली जाईल. पक्षाला मागील निवडणुकीत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळाली आहे. तसच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला मोठा विजय मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT