Narendra Modi Sarkarnama
देश

Sanatan Dharma : सनातन धर्माच्या रक्षणासाठी मोदी ‘हा’ निर्णय घेणार का? मित्रपक्षाच्या मागणीने चर्चांना उधाण

Pawan Kalyan Sanatan Dharma Rakshan Board NDA Government : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांच्या चरबीचे अंश आढळून आल्याचा दावा चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

Rajanand More

New Delhi : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रसादाचे लाडूसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी व माशांचे तेलाचे अंश आढळून आल्याचा दावा आंध्र प्रदेश सरकारने केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मोठी मागणी केली आहे.

पवन कल्याण यांनी भेसळीचा प्रकार समोर आल्याने सर्वजण खूप चिंतित असल्याचे म्हटले आहे. तत्कालीन सरकारने नेमलेल्या मंदिराच्या प्रशासकीय मंडळाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. आमचे सरकार कडक कारवाई करण्यासाठी कटिबध्द आहे. या प्रकारामुळे मंदिरांचा अपमान, जमिनीशी संबंधित मुद्दे आणि अन्य धार्मिक प्रथांशी संबंधित मुद्ये प्रकाशझोतात आल्याचे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.

सनातन धर्म रक्षण बोर्डाची मागणी

पवन कल्याण यांनी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची मोटी मागणी केली आहे. ते म्हणाले, आता वेळ आली आहे, देशातील मंदिरांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन केले जावे. यावर धोरणकर्ते, धार्मिक प्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, मीडिया आणि विविध क्षेत्रातील लोकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. सनातन धर्माचा अपमान रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.

मागणी पूर्ण होणार का?

पवन कल्याण यांच्या या मागणीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे मोदी सरकारकडून वक्फ बोर्डामध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता सनातन धर्म रक्षण बोर्डाच्या मागणीने जोर धरल्यास मोदी सरकार काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

काय घडले तिरुपतीमध्ये?

तिरुपतीच्या प्रसादासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी आणि माशांचे तेलाचे अंश आढळून आले आहेत. तेलगू देसम पक्षाने गुजरातमधील प्रयोगशाळेच्या रिपोर्टचा हवाला देत हा दावा केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तत्कालीन सरकारवर गंभीर आरोप केले आहे. प्रसादातील भेसळीवरून अनेकांनी तत्कालीन सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT